Take a fresh look at your lifestyle.

कुठेय लसटंचाई; पहा कुठे शिल्लक आहेत तब्बल २ कोटी लस..!

दिल्ली : करोना प्रतिबंधक लसींच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कायमच वाद होत आहेत. केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. तसेच अनेक ठिकाणी लसीकरण संथ गतीने सुरू आहे, अशा तक्रारी राज्यांकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, केंद्र सरकार सुद्धा या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचा दावा करत आहे. याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी असा दावा करत राज्यांकडे लसींचे एक कोटी डोस शिल्लक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले आहे, की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे दोन कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “चिमुरड्यांची काळजी घ्या रे..; 1 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह, पहा कुठे वाढतायेत रुग्ण @krushirang https://t.co/c61DVtqRPc” / Twitter

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने पुढे असेही म्हटले, की केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त करोना प्रतिबंधक लसी मोफत दिल्या आहेत. १६ मे पर्यंत यातील १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ डोसचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये खराब लसीचे डोस देखील समाविष्ट आहेत. म्हणजेच, राज्यांकडे सध्या दोन कोटींपेक्षा जास्त डोस शिल्लक आहेत. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात राज्यांना आणखी २ लाख ९४ हजार ६६० लसींचे डोस पुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. केंद्राकडून राज्यांना लस देण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन करुन लसीकरण केले जात आहे. तरी देखील अनेक राज्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. बऱ्याचदा नागरिक सुद्धा लस नसल्याने लसीकरण केंद्रांवरुन माघारी जातात. अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. तरी देखील केंद्र सरकार मात्र राज्यांकडे पुरेशा प्रमाणात लसी असल्याचा दावा करत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply