Take a fresh look at your lifestyle.

करोनासह ‘त्या’ही संकटाची मार, मध्यमवर्ग झालाय पुरता बेजार; पहा कसा झालाय खिशावर परिणाम

मुंबई : देशात करोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन केले आहे. काही राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. त्यामुळे राज्यांच्या अर्थव्यस्थेस जबरदस्त फटका बसला आहे. उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. लहान उद्योग तर पुरते उद्धवस्त झाले आहेत. लाखो लोकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकटे निर्माण झाली आहेत. करोनाने निर्माण केलेली ही संकटे कमी म्हणून की काय, यात आता महागाईच्या संकटाची भर पडली आहे.

Advertisement

करोना विषाणूच्या महाभयानक संकटात नागरिकांना आता महागाईच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने घाऊक किमतींची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात महागाई दरात मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. डाळी, फळे, अंडी, मांस यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर गहू, तांदूळ, भाज्या, बटाटे, कांदे या वस्तूंच्या किमती मात्र घटल्या आहेत.

Advertisement

एप्रिल महिन्यात महागाई दर १०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आधी मार्च महिन्यात हा दर ७.३९ टक्के इतका होता. मार्चच्या आधी फेब्रुवारी महिन्यात तर महागाई दर फक्त ४.८३ टक्के इतका होता. दोनच महिन्यांच्या काळात महागाईत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कच्चे तेल व पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने महागाई वाढल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “चिमुरड्यांची काळजी घ्या रे..; 1 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह, पहा कुठे वाढतायेत रुग्ण @krushirang https://t.co/c61DVtqRPc” / Twitter

Advertisement

दरम्यान, करोना संकटात आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. रोजगार नसल्याने पैशांचा मोठा प्रश्न आहे. या काळात पैसे जपून खर्च करण्याकडे कल वाढला आहे, आणि ते गरजेचेच आहे. या संकट काळात नागरिक होरपळत असताना त्यांना दिलासा देण्याचे काम मात्र सरकारकडून होताना दिसत नाही. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपासून खाद्य तेलांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यानंतर आता महागाईच्या संकटानेही त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या संकटांची जाणीव सरकारला नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र, या समस्या कमी करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात नसल्याचे दिसत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply