Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद..! बाजार समित्या उतरल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत, पहा काय केलंय..?

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या.. शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम देणारे ठिकाण.. राज्यामध्ये ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक योद्धे उतरले आहेत. त्यात आता बाजार समित्यांही मागे राहिलेल्या नाहीत. बाजार समित्यांनी (Market committee) राज्यात 730 खाटांची 8 कोरोना रुग्णालये सुरू केली आहेत. आणखी तीन ठिकाणी 200 खाटांची रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. तसेच 22 कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी, कोविड सेंटर (covid centre) सुरू करण्याचीही तयारी दर्शवली आहे.

Advertisement

कोविडमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. रुग्णालयामध्ये बेड मिळत नाही. अशा वेळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशिन, तसेच कोविड उपचारांशी निगडीत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.

Advertisement

पारोळा, अहमदनगर, शेवगाव, बार्शी, मानवत, जिंतूर, सेलू आणि परभणी अशा आठ ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू झाली आहेत. तसेच, परळी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये लवकरच सुरू केली जाणार आहेत. खामगाव आणि भिवंडी या दोन बाजार समित्यांनी वैद्यकीय साहित्यासाठी २५ लाख रुपये दिले आहेत.

Advertisement

बाजार समित्यांनी कोविड सेंटरची उभारणी करण्याचे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. बाजार समित्यांनी पणन संचालकांकडे सरप्लस रकमेतून खर्चाची परवानगी मागितली होती. 10 लाखांवर सरप्लस असलेल्या १३७ बाजार समित्या असून, त्यांनी कोविड सेंटर सुरू करणे, तसेच इतर कोविड सेंटरला अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविल्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply