Take a fresh look at your lifestyle.

होऊ द्या खर्च..! दोन महिन्यांत दोनदा पगारवाढ, पहा कोणत्या कंपन्यांनी दिलीय..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली होती. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीत नोकरी टिकवणेच मुश्किल झाले होते, तर पगारवाढ कोण मागणार आणि देणार..?

Advertisement

गेल्या वर्षी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लांबणीवर टाकली होती. मात्र, यंदा अवघ्या काही महिन्यांच्या अंतरानेच या कंपन्यांनी दुसरी वेतनवाढ दिली आहे. गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना दोन महिन्यात दोनदा वेतनवाढी मिळाल्या आहेत.

Advertisement

‘एक्सचेंजर इंडिया’मध्ये (Exchanger India) २ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. त्यांना डिसेंबर-2020च्या अखेरीस वार्षिक वेतनवाढ, बोनस आणि पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या  दोन महिन्यात फेब्रुवारी-2021 दुसऱ्यांदा पदोन्नत्या देण्यात आल्या.

Advertisement

एप्रिलमध्ये सहयोगी संचालक असणाऱ्यांना एकरकमी ‘थँक यू बोनस’ देण्यात आला. येत्या जूनमध्ये आम्ही पुन्हा पदोन्नत्या देणार आहोत. गेल्या डिसेंबरमध्ये पदोन्नत्या देऊन ६०५ जणांना एमडी, तर ६३ जणांना एमडी करण्यात आले होते. त्यात महिलांची संख्या विक्रमी होती, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Advertisement

‘टीसीएस’ (TCS)नेही सहा महिन्यांत दुसरी वेतनवाढ देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिलपासून प्रभावी असलेल्या पहिल्या वेतनवाढीत कंपनीने ६ ते ८ टक्क्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला आहे. विप्रोचे (Wipro) सीईओ थेरी डेलापोर्ट यांनी कर्मचाऱ्यांना जूनपासून वेतनवाढ देणार असल्याचे सांगितले.

Advertisement

‘एचसीएल'(HCL)चे मुख्य एचआर अधिकारी अप्पाराव व्ही. व्ही. म्हणाले की गेल्या वर्षी आम्ही एका तिमाहीने वेतनवाढ पुढे ढकलली होती. यंदा नेहमीप्रमाणे जुलैमध्ये वाढ दिली जाईल. टेक महिंद्रा (Tech Mahindra) चे जागतिक लोकाधिकारी हर्षवेंद्र सोनी यांनी 1 एप्रिलपासून प्रभावी वेतनवाढ दिल्याचे सांगितले.

Advertisement

‘इन्फोसिस’ देणार 10-14 टक्के वाढ

Advertisement

‘इन्फोसिस’ (Infosys ltd)चे ईव्हीपी आणि एचआर प्रमुख रिचर्ड लोबो यांनी सांगितले की, या वर्षातील दुसऱ्या वेतनवाढीची प्रक्रिया कंपनीने सुरू केली आहे. जानेवारीपासून प्रभावी असलेली पहिली वेतनवाढ यापूर्वीच देण्यात आली. दुसरी वेतनवाढ जुलैपासून प्रभावी असेल. दोन्ही प्रक्रिया मिळून सर्व पातळ्यांवरील कर्मचाऱ्यांना १० ते १४ टक्क्यांची वाढ मिळेल.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply