Take a fresh look at your lifestyle.

लावा जोर..! ‘या’ विमान कंपनीचे शेअर्स विक्रीला; पहा कशामुळे आली ही वेळ..?

मुंबई : गो-एअरलाइन्स (इंडिया) लिमिटेड.. हवाई सेवा क्षेत्रातील आघाडीची विमान कंपनी. 2018 मध्ये या कंपनीचा स्थानिक बाजारपेठेतील हिस्सा 8.8 टक्के होता. तो 2020 मध्ये 10.8 टक्के झाला होता. 2020 मध्ये ‘गो-एअर’ (Go-Air) विमानाचा वापर खूप होता. 31 जानेवारी 2020 पर्यंत ‘गो-एअर’ने 28 स्थानिक आणि 9 आंतरराष्ट्रीय ठिकाणांना विमानसेवेने जोडले होते.

Advertisement

..तर इतके सगळे सांगण्याचे कारण म्हणजे ‘गो-एअर’ने 3600 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी त्यांचे समभाग (IPO) विक्रीची घोषणा केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) ‘गो-एअर’ला निधी उभारणीची परवानगी दिली. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड ऑफ इंडियामध्ये कंपनीचे ‘इक्विटी शेअर्स’ (Equity shares) सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित केले आहे.

Advertisement

‘गो-एअर’कडून ‘आयपीओ’मध्ये 3600 कोटीपर्यंतचे ‘फ्रेश इक्विटी शेअर्स’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रारंभिक समभाग विक्री योजनेसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांची जागतिक पातळीवरील समन्वयक आणि ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

निधीचा वापर कशासाठी..?

Advertisement
  • ‘गो-एअर’ने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा अंशतः मुदतपूर्व परतफेड किंवा नियोजित परतफेड करणे
  • लीझ भाडेपट्टी आणि विमानांची भविष्यातील देखभालीसाठी काही ‘एअरक्राफ्ट लेसर्ना’ जारी केलेल्या पतपत्रांची रोख जमा करून ‘रिप्लेसमेंट’ करणे.
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने कंपनीला पुरविलेल्या इंधनाचे पूर्ण किंवा अंशतः पेमेंट करणे.
  • सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करणे. विस्तारीकरणाचा भाग म्हणून ‘गो-एअर’ने 144 एअरबस ए-320 ‘एनईओ’च्या डिलिव्हरीसाठी फर्म ऑर्डर दिली आहे. पैकी कंपनीने 46 एअरबस ए-320 एनईओ विमानांची डिलिव्हरी घेतली आहे. राहिलेल्या 98 एअरबस ए-320 एनईओच्या डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत आहे.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply