Take a fresh look at your lifestyle.

हाहाकार.! तौक्‍ते चक्रीवादळाचा तीन राज्यांना तडाखा, पहा कुठे, किती नुकसान झालेय..?

मुंबई : कर्नाटक, केरळ आणि गोव्यामध्ये आज (ता. 16) तौक्‍ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकात 73 गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गोव्यातही पावसाने सकाळपासून धुमाकूळ घातला असून, पणजीत शेकडो झाडे कोसळली आहेत.

Advertisement

महाराष्ट्राच्या किनारावर्ती भागात जोरदार पाऊस झाला. येत्या 12 तासांत या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती हवामान खात्याने व्यक्‍त केली आहे. गुजरातमधील पोरबंदर ते महुआ या दरम्यान मंगळवारी (ता.18) सकाळी हे वादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता आहे. गुजरातकडे हे वादळ सरकत असले, तरी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारावर्ती भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत.

Advertisement

केरळमधील मल्लपुरम, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’, तर अन्य जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तीनही राज्यांच्या किनारावर्ती भागात येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. पुढील सूचना येईपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Advertisement

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी ट्‌विटरद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात सरासरी 145 मिमी पाऊस पडला आहे. कोची आणि रिमेड येथे 200 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. एर्नाकुलम आणि कोझीकोडे येथे वादळाने दोन जणांचा बळी घेतला. सखल भागातील अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले असून, शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

Advertisement

तौक्‍ते वादळाने कर्नाटकातील चार जणांचा मृत्यू झाला. सहा जिल्ह्यांतील 73 गावांना जबर फटका बसला आहे. मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू केल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात उशिराने मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई महापालिकेने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तीन कोरोना केअर सेंटरमधील 580 बाधित अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

गोव्यात जोरदार वारे आणि पावसाने अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक झाडे उन्मळून पडली. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वाहनांवर झाडे पडल्याने शेकडो वाहनांचे नुकसान झाले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply