Take a fresh look at your lifestyle.

जमत नसलं, तर आम्हाला विसरा..! ‘व्हाॅट्स ॲप’ची ताठर भूमिका, पाहा कशामुळे आलीय ही वेळ..?

मुंबई : व्हाट्स ॲपची ‘प्रायव्हेट पॉलिसी’ स्वीकारण्याची मुदत शनिवारी (ता.15) संपली. युजर्सना ही पॉलिसी स्वीकारावीच लागेल, अन्यथा व्हाट्स ॲप सोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसेल. कारण, आपल्या पॉलिसीबाबत कोणतीही तडजोड करण्यास व्हाट्स ॲप तयार नाही.

Advertisement

भारतात 50 कोटींहून अधिक व्हाट्स अपचे वापरकर्ते आहेत. फेसबुक मालकीच्या व्हाट्स अपने काही दिवसांपूर्वी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. त्यामुळे नागरिकांच्या खासगी जीवनात व्हाट्स अँप ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप झाला.

Advertisement

‘प्रायव्हसी पॉलिसी’च्या सक्तीमुळे अनेक युजर्सनी व्हॉट्स अॅप लाच अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्हाट्सअपने 15 मेपर्यंत पॉलिसी स्वीकारण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत शनिवारी संपली. हायकोर्टात शनिवारी झालेल्या सुनावणीत व्हाट्स अपच्या वकिलांनी पॉलिसीचे समर्थन करताना, ‘ग्राहक हा ‘प्लॅटफॉर्म’ सोडू शकतात..’, असे सांगितले.

Advertisement

सध्या व्हाट्स अँपची सेवा सुरु असली, तरी त्यात यापुढे ठराविक अंतराने बदल होत जातील. युजर्सना सुरुवातीला टप्प्याटप्प्याने पॉलिसी स्वीकारण्याबाबत आठवण करून देणारे मेसेज येतील. नंतर हळूहळू ‘व्हिडिओ कॉल्स’, व्हॉइस कॉल्स आणि चॅटींग बंद होऊ शकते. त्यानंतर व्हाट्स अपवर फक्त एकच संदेश येईल, ‘पॉलिसी स्वीकारा, अन्यथा व्हाट्स अप सोडा..!’

Advertisement

युजर्सना नाइलाजाने एक तर पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल, किंवा व्हाट्स अप सोडून अन्य मेसेंजिंग ॲप जवळ करावे लागतील. वारंवार आठवण करून दिल्यानंतरही ‘प्रायव्हसी पॉलिसी’ स्वीकारलीच नाही, तर सर्व ‘इन्कमिंग कॉल्स’ बंद होतील.

Advertisement

मेसेजही 24 तासांत होणार गायब
व्हाट्स अपवरील स्टेटसप्रमाणे आता येणारे मेसेजही 24 तासांत गायब होणार आहेत. सध्या पाठवलेले मेसेज सात दिवसानंतर आपोआप गायब होतात, मात्र कंपनी आता त्यात बदल करणार आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply