Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे निर्माण होऊ शकतो सोयाबीन बियाण्याचा तुटवडा; पहा नेमकी काय झालीय महाराष्ट्राची अडचण

जालना / औरंगाबाद : यंदा प्रथमच सोयाबीनचे भाव थेट 8 हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पल्याड गेलेले आहेत. परिणामी यंदा महाराष्ट्रासह एकूणच भारतभरात सोयाबीनची लागवड वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी अगोदरच सोयाबीन बियाण्यांची कमतरता असताना आता इतर राज्यांनी सोयाबीन बियाणे परराज्यात पाठवायला बंदी घातल्याने महाराष्ट्रातील बियाणे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याकडे  केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कृषी कल्याण मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे.

Advertisement

दानवे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशीही चर्चा याबाबत चर्चा केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बियाणे बाहेर जाऊ न देण्याचा आदेश इतर राज्यांनी काढला आहे. महाराष्ट्रात जे सोयाबीन बियाणे येते त्याच्यावरच यामुळे मोठा परिणाम होणार असून राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

दानवे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने नियोजन केले नसल्याचीही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने वेळीच नियोजन करणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांची तयारी सुरू असताना कोणतीही तयारी केली नसल्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ उडू शकते आणि त्यांचे नियोजन कोलमडू शकते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply