Take a fresh look at your lifestyle.

पीएम केअरच्या व्हेंटीलेटर्सचे होणार ऑडीट; पहा कोणी दिलाय ‘हा’ महत्वाचा आदेश

दिल्ली : देशात करोनाचे संकट वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या संकटकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना ऑक्सिजन, करोना प्रतिबंधक लस, व्हेंटीलेटर्स तसेच अन्य आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला जात आहे. केंद्राने राज्यांना दिलेल्या व्हेंटीलेटर्सबाबत मात्र काही राज्यांनी केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच काही ठिकाणी या व्हेंटीलेटर्सचा वापर होत नसल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्सचे ऑडीट करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

Advertisement

(3) Krushirang on Twitter: “अर्र.. म्हणून मोदीजींना सोडून फडणविसांनी लिहिले थेट सोनिया गांधींनाच पत्र..! @krushirang https://t.co/0kCABeCzyB” / Twitter

Advertisement

देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मोदी यांनी आदेश दिले. केंद्र सरकारने राज्यांना व्हेंटीलेटर दिले होते. मात्र, अनेक राज्यांनी या व्हेंटीलेटरबाबत तक्रारी केल्या होत्या. व्हेंटीलेटरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचेही काही ठिकाणी दिसून आले होते. तर काही ठिकाणी या व्हेंटीलेटर्सचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले होते. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यामुळे आता या व्हेंटीलेटर्सच्या वापराचे ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त या बैठकीत कन्टेन्मेंट झोनसंदर्भात रणनिती, करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर, ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा करणे यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, देशात अजूनही करोना विषाणू नियंत्रणात आलेला नाही. दुसऱ्या लाटेत दररोज लाखोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कठोर केले जात आहेत. तसेच देशात करोना प्रतिबंधक लसीकरणही सुरू करण्यात आले आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शे

Advertisement
Advertisement

Leave a Reply