Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक वास्तव : रुग्ण नाही, आरोग्य यंत्रणाच आहे ऑक्सिजनवर; पहा नेमके काय आहे अहवालात

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा आणि एकूण प्रशासकीय गोंधळ यांचे वास्तव जगजाहीर झाले. त्याचवेळी ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाल्याचा बातम्या आल्या. यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मतभेदही समोर आले. विरोधी पक्ष भाजपने यावरून राजकीयदृष्ट्या रान उठवताना केंद्र सरकारला क्लीनचीट दिली. मात्र, एकूणच राच्यात रुग्ण नाही, तर थेट आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “इस्राइल सैन्याने केलेय पॅलेस्टाईनच्या ‘त्या’ भागाला केलेय लक्ष्य; पहा कुठे हल्ला करून केलाय मोठा विध्वंस https://t.co/vsBrsWZZVT #मराठी #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #IsraelPalestine #IsraelUnderFire #IsraeliAttackonAlAqsa” / Twitter

Advertisement

हा अहवाल विरोधी देशाचा, राज्याचा किंवा सामाजिक संस्थांचा नाही. तर, हा धक्कादायक अहवाल दिला आहे राज्य सरकारच्याच एका समितीचा. होय, ही समिती राज्य सरकारने २३ एप्रिलला स्थापन केली होती. ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांच्या समित्या स्थापन करून सर्व रुग्णालयांत आॅक्सिजन आॅडिटचे आदेश दिले होते. त्याच समितीने आपला अहवाल सादर केला आहे. समितीने संबंधित जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांच्या आॅक्सिजन वायुनलिका व प्रणालींची तपासणी केली आहे. या अहवालातील धक्कादायक मुद्दे असे :

Advertisement
  • दि. ९ मेपर्यंत ६ महसुली विभागातील शासकीय ३३५, तर खासगी १४७९ रुग्णालयांची तपासणी झाली
  • शासकीय २५४ (७५ %) व खासगी १४६५ (९९ %) अशा एकूण १७७९ (९५%) रुग्णालयांत आॅक्सिजन व्यवस्थापनात गंभीर त्रुटी
  • अमरावती महसूल विभागात १६८ पैकी सर्व रुग्णालयात त्रुटी आढळून आल्या
  • मुंबई विभागात २७१ पैकी सर्व रुग्णालयात अशा त्रुटी
  • नागपूर महसूल विभागात २४४ पैकी सर्व रुग्णालयांत त्रुटी
  • पुणे महसूल विभागात २३१ पैकी सर्व रुग्णालयांत आॅक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी
  • औरंगाबाद विभागात १३० शासकीय रुग्णालयांपैकी ५८ रुणालयात तर खासगी ४९५ पैकी २८३ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या
  • नाशिक विभागात ६० शासकीय रुग्णालयांपैकी ५१ तर ४१५ खाजगी पैकी ४१३ रुग्णालयात आॅक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी

अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत म्हटले आहे की, राज्याला दैनंदिन १७०० टन आॅक्सिजनची गरज असताना रोज फ़क़्त १२५० टन आॅक्सिजन उत्पादन होते. ही तूट भरून काढण्यासाठी हवाई दल व रेल्वेच्या राेरो सेवेची मदत घेतली आहे. शासकीय रुग्णालयातील आॅक्सिजन व्यवस्थापनातील त्रुटी दूर केल्या जात असून खासगी रुणालयांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

Krushirang on Twitter: “बाब्बो.. आणि इस्राइलनेच उभे केले ‘हमास’; पहा नेमकी कशी उभी राहिली ही जगप्रसिद्ध संघटना @krushirang #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #IsraelPalestine #IsraelUnderFire #IsraeliAttackonAlAqsa https://t.co/ZBnNx6qBZG” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply