Take a fresh look at your lifestyle.

नागरिक व व्यावसायिकांना झटका; तर मोदी सरकारला आलेत ‘अच्छे दिन’..!

मुंबई : देशात करोनाचे संकट वाढत आहे. मागील वर्षातील देशव्यापी लॉकडाउन आणि आता दुसऱ्या लाटेत करोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. यामुळे मात्र अनेकांचे रोजगार गेले. राज्यांचे महसूल घटले. उद्योग व्यवसाय बंद पडले. लघु उद्योग उद्धवस्त झाले. अर्थव्यवस्थेसही जबर फटका बसला. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारच्या उत्पन्नावर या संकटाचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. कारण दर महिन्यास जीएसटीचे संकलन वाढत आहे. तसेच आता देशाच्या परकीय चलनसाठ्यातही वाढ झाल्याचे आरबीआयच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

देशाच्या परकीय चलन साठ्यात या आठवड्यात १.४४४ अब्ज डॉलर्स वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशाचा परकीय चलन साठा ५८९.४६५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. ७ मे २०२१ रोजी आरबीआयने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार परकीय चलन साठ्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यात काही दिवसांपासून वाढ होत आहे. देशात करोनाचे संकट वाढत आहे. यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. तरी सुद्धा परकीय चलन साठ्यात वाढ होत आहे, हे विशेष.

Advertisement

३० एप्रिल अखेर संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात ३.९१३ अब्ज डॉलरची वाढ झाली होती. त्यामुळे चलन साठा ५८८.०२ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर पुढील आठवड्यात सुद्धा ही वाढ कायम राहिली आहे. जानेवारी २०२१ च्या तुलनेत मात्र हा चलन साठा कमीच असल्याचे म्हटले आहे. या व्यतिरिक्त देशाच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. सोन्याचा साठा १.०१६ अब्ज डॉलरने वाढून ३६.४८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. एका अर्थाने यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला अच्छे दिन आले असून करोना संकटात अनेकांचे रोजगार गेल्याने आणि व्यावसायिक आर्थिक संकटात आल्याचे चित्र आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply