Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला घरघर, आठवडाभरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी कोसळले भाव..!

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट गडद होत असताना, त्याचे परिणाम बाजारावरही दिसत आहेत. कोरोनाचे संकट आणि पाठोपाठ घसरलेली अर्थव्यवस्था, यामुळे गेल्या वर्षी लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली होती. त्यामुळे मागील वर्षी सोन्याचे भाव चढे होते. मात्र, आता ते या महिन्यापासून उतरू लागले आहेत. या आठवड्यात सोन्याचे दर (Gold price) सातत्याने घसरत आहेत. वायदे बाजारात आजही (ता.15) सोन्याचे दर 600 रुपये प्रती तोळा कोसळले. सराफा बाजारातही सोन्याच्या भावात घसरण झाली.

Advertisement

सोन्याचा वायदे बाजारातला दर गेल्या सोमवारी (ता.10) MCX वर 48,000 रुपये प्रति तोळा होता. आठवडाभर दर घसरत आज शेवटच्या दिवशी (शनिवारी) सोन्याचा दर 47,300 रुपये पातळीवर स्थिर झाला. कालही (शुक्रवारी) सोन्याच्या दरात MCX वर सोने वायद्याचा दर 100 रुपयांनी कमी झाला.

Advertisement

गेल्या वर्षभरात सोन्याने गुंतवणूकदारांना 43 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वायदे बाजारात सोन्याचा दर MCX नुसार 56191 प्रति दहा ग्रॅमवर होते. गेल्या वर्षीच्या या सर्वोच्च भावाची तुलना केली, तर सोन्याचा भाव 25 टक्क्यांनी उतरला आहे. MCX नुसार 47300 रुपये प्रति 10 ग्रॅम, असा सध्याचा स्थिरावलेला दर आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 8900 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे.

Advertisement

आठवडाभरात वायदे बाजारात झालेली सोन्याची घसरण

Advertisement

दिवस…………. सोनं (MCX जून वायदा)

Advertisement

सोमवार …….47951
मंगळवार…… 47633
बुधवार ………47482
गुरुवार…….. 47438
शुक्रवार……. 47340
शनिवार……. 47300

Advertisement

सोन्याचा वायदा या आठवड्यात 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. सराफा बाजारातले सोन्याचे दरही घसरले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावरही सोन्याला अपेक्षित दर मिळाला नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply