Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या : म्हणून वाढला आहे काळ्या बुरशीचा धोका; पहा नेमके काय म्हटलेय डॉ. गुलेरियांनी

दिल्ली : देशभरात करोना विषाणूच्या साथीबरोबरच काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. अशावेळी बातम्या आणि इतर उलटसुलट अफवांचे पिक जोमात आहे. अशावेळी एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत काही महत्वाची माहिती दिली आहे.

Advertisement

कोरोना रूग्णांमध्ये बुरशीजन्य संक्रमण अधिक प्रमाणात आढळत आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, बुरशीचे संक्रमण आधी फारच कमी होते. हे उच्च मधुमेह, रोग प्रतिकारशक्ती कमी करणारे रुग्ण किंवा केमोथेरपीवरील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिसून येत. मात्र, आता सर्रास अशी प्रकरणे समोर येत आहेत. जास्त प्रमाणात स्टिरॉइड्स वापरल्यामुळे ब्लॅक फंगल होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले की, एम्समध्येच बुरशीजन्य संसर्गाची 23 प्रकरणे आहेत. यापैकी 20 अद्याप कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि 3 कोरोना निगेटिव्ह आहेत. अनेक राज्यांमध्ये बुरशीजन्य संसर्गाचे 400-500 रुग्ण सापडले आहेत. डोळे, नाक, घसा, फुफ्फुसांवर याचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे डोळे दुखणे, नाकातून रक्त, छातीत दुखणे असेही लक्षण दिसत आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “बाब्बोव.. म्हणून ‘हा’ मासा खायला द्यावा लागते सोन्यासारखाचा पैसा; पहा किती आहे या माशाची किंमत..! @krushirang https://t.co/abTJAHlugp” / Twitter

Advertisement

या म्युकर माइकोसिस नावाच्या काळ्या बुरशीवर उपचार उपलब्ध आहेत. फ़क़्त वेळीच त्यावर उपचारास सुरुवात होने आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने तर महात्मा फुले जीवनदायी योजनेतून यावर उपचार करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात संपर्क करावा.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply