Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ प्रशासकीय हलगर्जीपणाचा ग्राहकांना झटका; पहा खाद्यतेलाचे भाव वाढण्यासाठी नेमके काय झालेय प्रकरण

मुंबई : सध्या देशभरात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. अशावेळी ‘जमिनी विकून जेमिनी खायची वेळ आलीय’ यासारखे डायलॉग आणि मिम्स वेगाने व्हायरल होत आहेत. करोना कालावधीत आर्थिक संकट असतानाच ही भाववाढ अनेक कुटुंबियांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्याला बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे गणित नाही तर प्रशासकीय हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. कारण, देशाला तब्बल 15 दिवस पुरेल इतके खाद्यतेल बंदरांवर अडकून पडलेले आहे.

Advertisement

केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कांडला आणि मंुद्रा बंदरावर काही खाद्यतेल रोखल्याचे मान्य केलेले आहे. मात्र, त्याचे नेमके कारण अजूनही केंद्र सरकारच्या यंत्रणेकडून सांगण्यात आलेले नाही. दोन आठवड्यांपासून अधिक काळ आयात केलेल्या खाद्यतेलाचा साठा अडकून पडल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. हा माल जारी करण्यासाठी आतापर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे भाव उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “त्यामुळे निर्माण होऊ शकतो सोयाबीन बियाण्याचा तुटवडा; पहा नेमकी काय झालीय महाराष्ट्राची अडचण @krushirang https://t.co/Q5o82DepLc” / Twitter

Advertisement

कच्चे पाम तेल, रिफाइंड ऑइल आणि सोया तेलाच्या काही कन्साइनमेंट क्लिअरन्सची प्रक्रिया रखडल्याने हा गोंधळ झाला आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशनच्या(एसईए)  यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने यासंदर्भात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करूनही काहीच मार्ग निघालेला नाही. सामान्य जोखमीचे आकलन करण्याठी केल्या जाणाऱ्या काही या तेलाच्या चाचण्या करण्याची प्रक्रियाही यामुळे अडकली आहे. एकूणच केंद्र सरकारच्या कृपेने भारतीय ग्राहकांना खाद्यतेलाच्या महागाईला सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply