Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : DRDO च्या ‘2डीजी’चे पाकिटे तयार; पुढच्या आठवड्यात ‘त्यांना’ मिळणार औषध

मुंबई : मागील आठवड्यात ड्रग नियामक डीजीसीआयने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ‘2 डीजी’ या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. हे औषध डीआरडीओने विकसित केले आहे. आता डीआरडीओने याबाबत सांगितले आहे की, 2 डीजीच्या 10 हजार डोसची पहिला लॉट पुढील आठवड्याच्या सुरुवातीस उपलब्ध होईल.

Advertisement

देशभरात सध्या सर्वच रुग्णालये आणि नागरिक या स्वदेशी औषधाची वाट पाहत आहेत. औषध उत्पादक कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या औषधाचे उत्पादन वाढविण्याचे काम करत आहेत. डीआरडीओने हे औषध 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) तयार केले आहे. कोरोना विषाणूची वाढ रोखण्यासाठी हे औषध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

ANI on Twitter: “The first batch of 10,000 doses of 2DG medicine for curing COVID-19 patients would be launched early next week and will be given to patients: DRDO officials https://t.co/DmgDzxFgpd” / Twitter

Advertisement

डीजीसीआयच्या म्हणण्यानुसार या औषधाच्या वापरामुळे शरीरात विषाणूच्या वाढीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांच्या आरोग्यामध्ये जलद प्रतिसाद यामुळे मिळतो याव्यतिरिक्त यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता कमी होते. हे औषध पावडरच्या स्वरूपात येते आणि ते पाण्यात विरघळल्यानंतर रुग्णांना दिले जाऊ शकते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply