Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग, तुम्हाला मिळाले नसल्यास ‘इथे’ करा तक्रार..!

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमधील 7 लाख शेतकर्‍यांनी या योजनेचा पहिल्यांदा लाभ घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत.

Advertisement

बंगालमधील 7 लाख शेतकर्‍यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला. पीएम किसान सन्मान निधी योजनेत सुमारे 11 कोटी शेतकर्‍यांना आतापर्यंत 1 लाख 35 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. पैकी 60 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये हे फक्त कोरोना काळात दिले आहेत.

Advertisement

केंद्र सरकाराकडून ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये मिळतात. ही रक्कम लाभार्थ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली, डिसेंबर 2018 पासून त्याची अंमलात आली होती.

Advertisement

आपले नाव असे चेक करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असेल, तर पंतप्रधान किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) आपले नाव तपासू शकता. त्यासाठी वेबसाइट उघडल्यानंतर मेनू बारमधील ‘फार्मर कॉर्नर’वर क्लिक करा. येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा. यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा. नंतर आपल्याला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.

Advertisement

अशी तक्रार नोंदवा
आपण नोंदणी करूनही लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नसेल, तर आपण ‘पीएम किसान’ या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकता.

Advertisement

पीएम किसान हेल्पलाईन – 155261
पंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक – 011-23381092, 23382401
ईमेल आयडी – pmkisan-ict@gov.in

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply