Take a fresh look at your lifestyle.

आज्जी तर ‘सुपर दादी’च; HRCT 20 आणि ऑक्सिजन 75 वर जाऊनही केली करोनावर मात..!

अहमदनगर : नाव वत्सलाबाई कदम.. वय तब्बल 79 वर्षे.. करोनाने आजारी पडल्या.. एचआरसीटी स्कोअर 20/25 वर पोहोचला.. ऑक्सिजन पातळीही 75 वर पोहोचली.. आणि उपचार सुरू झाले.. देशभरात अनेकांनी धीर सोडून करोना विषाणूला जिंकण्यासाठी मार्ग खुला केलेला असताना या ‘सुपर दादी’ने थेट करोनालाच मूठमाती दिली. होय, हे वास्तव आहे. श्रीरामपूरमध्ये ही आश्चर्यकारक घटना घडली आहे.

Advertisement

सध्या व्हाटस्अॅप विद्यापीठाचे पीएचडी होल्डर करोना सल्ला देण्यात आघाडीवर आहेत. आला मेसेज की दिला हजारो लोकांना पाठवून. अशावेळी अशास्त्रीय माहिती आणि संशोधनाचा उत आलेला आहे. त्यातून अजूनही वृद्ध आणि अशिक्षित बाहेर आहेत. त्यामुळेच करोना झाल्यावर आकडे पाहून किंवा ऐकून त्यांच्यावर नकारात्मक परिणाम शक्यतो होत नाही. या ‘सुपर आजी’चेही असेच झाले. अफवांची माहिती नसल्याने मानसिकता साकारात्नक ठेऊन वत्सलाबाई कदम यांनी करोनाला हरवले आहे. त्या बर्या झाल्यानंतर त्यांचा विशेष सत्कार करून रुग्णालयाने त्यांना निरोप दिला.

Advertisement

Krushirang on Twitter: “त्यामुळे निर्माण होऊ शकतो सोयाबीन बियाण्याचा तुटवडा; पहा नेमकी काय झालीय महाराष्ट्राची अडचण @krushirang https://t.co/Q5o82DepLc” / Twitter

Advertisement

श्रीरामपूरतील विघनहर्ता कोविड केंद्रात वत्सलाबाई यांच्यावर उपचार झाले. त्याबाबत डॉ. प्रमोद गाडे यांनी सांगितले की, आम्ही आमचे सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावून शेकडो रुग्ण कोरोना मुक्त करू शकलो. आणीबाणीत डॉक्टरांना मानसिक बळ महत्त्वाचे आहे. वत्सलाबाई यांच्यासह 50 वर्षीय उच्च रक्तदाब असलेले रुग्ण केशव काळे यांनीही स्कोअर 22 व ऑक्सिजन पातळी 60 असताना करोनावर मात केली आहे. तर, अशाच पद्धतीने इतरही अनेक रुग्णांनी इच्छाशक्तीच्या जोरावर करोनाला हरवले आहे.

Advertisement

विघनहर्ता कोविड केंद्रात डॉ. गाडे यांच्यासह डॉ. सुशील गाडे हे दोघे बंधू, डॉ. बसवराज सुतार, डॉ. कौशिक, दीपक उघडे, नयन ठोंबरे यांच्याकडून वैद्यकीय सेवा दिली जाते. असे रुग्ण जिद्दीच्या जोरावर बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते घरी सोडण्यात आले.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply