Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ‘त्या’ शेअरने दिला इन्व्हेस्टर्सना गोडवा; महिन्यात जवळजवळ डबलच पैसे झाले की

मुंबई : मागील काही आठवड्यांत जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शुगर फॅक्टरीवाल्या कंपन्याही जोमात आहेत. मागील 1 महिन्यामध्ये 500 कोटी रुपयांच्या मार्केट कॅप असलेल्या सर्व 12 कंपन्यांचे शेअर्स किमान 20 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत 6 कंपन्यांचे शेअर्स तर 60 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

Advertisement

जगातील साखर निर्यातदार असलेल्या ब्राझील आणि थायलंडमध्ये यावर्षी दुष्काळामुळे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत 7 ते 8 दशलक्ष टन कमी असल्याचे अनुमान आहे. याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होण्याच्या शक्यतेने बाजारात ही ग्रोथ पाहायला मिळाली आहे. जर जास्त प्रमाणात साखरेचा वापर इथेनॉल तयार करण्यासाठी केला गेला तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर वाढतील. या कारणांमुळे साखर उद्योगाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. मोतीलाल ओसवाल यांनी एका अहवालात लिहिले आहे की, जगातील मागणी-पुरवठ्याची परिस्थिती, अनुकूल धोरणे, देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलमधील वाढ करण्यावर जोर देणे आणि जास्त इथॅनॉल क्षमता वाढविणे यामुळे किंमती वाढतील. एक महिन्यात बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेड कंपनीच्या समभागात तब्बल 86% वाढ झाली आहे. 9 एप्रिल रोजी 6.67 रुपयांवर असलेला हा शेअर 11 मे रोजी ते 12.39 रुपयांवर पोहोचला. तसेच इतर कंपन्यांच्या शेअरमधील वाढ अशी :

Advertisement
कंपनी महिन्यात वाढ (%)
बजाज हिंदुस्तान शुगर 86
धामपुर शुगर मिल्स 72
द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज 66
त्रिवेणी इंजीनियरिंग एंड इंडस्ट्रीज 65
अवध शुगर एंड एनर्जी 63
डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज 62
डालमिया भारत शुगर एंड इंडस्ट्रीज 58
उत्तम शुगर मिल्स 53
बलरामपुर चीनी मिल्स 39
ईआईडी पैरी (इंडिया) लिमिटेड 30
श्री रेणुका शुगर्स 26
बन्नारी अम्मन शुगर्स 19.50

 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply