Take a fresh look at your lifestyle.

फुकटेगिरीला चाप..’अमेझॉन प्राईम’ची ‘ही’ सेवा बंद, पहा ‘आरबीआय’ने काय आदेश दिलाय..?

मुंबई : अमेझॅान प्राईम..ई-कॅामर्स कंपनी अमेझॅानचा ‘ओव्हर दी टॅाप’ (OTT) सेवा देणारा प्लॅटफॅार्म. अनेक उत्तम चित्रपट आणि वेबसिरीज दाखविणारे एक प्रकारचे मायाजालच.. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अमेझॅान प्राईम’ने (Amezon Prime) अनेक आमिषे दाखवली. त्यापैकीच एक होते, महिनाभर फुकट ‘अमेझॅान प्राईम’ पाहण्याची संधी. शिवाय दरमहा अवघ्या 129 रुपयांत चित्रपट रसिक ‘अमेझॅान प्राईम’चा आनंद लुटत होते. मात्र, आता त्यांना ही सेवा मिळणार नाही. फुकट्यांच्या तर साऱ्या नाड्याच आवळल्या आहेत. कशामुळे ‘अमेझॅान प्राईम’वर ही वेळ आली, हे आपण जाणून घेऊ या..

Advertisement

..तर ‘रिझर्व्ह बॅंके’च्या (Reserve bank of India) एका आदेशामुळे ‘अमेझॅान’ला असे करणे भाग पडले आहे. बॅंका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या अतिरिक्त घटक प्रमाणीकरणासाठी (Additional Factors of Authentication – AFA) रिझर्व्ह बॅंकेने काही सुधारित मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशांची अंमलबजावणी करण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेने 2019 मध्ये 2000 रुपयांपर्यंतच्या ‘आवर्ती आर्थिक व्यवहारां’साठी AFA मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानंतर त्यात बदल करून त्याची मर्यादा 5000 रुपयांपर्यंत वाढविली. त्यापुढील आर्थिक व्यवहारांसाठी ‘ओटीपी’ लागेल, असे स्पष्ट केले होते. आता वाढीव मुदतीत या मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशारा ‘आरबीआय’ने दिला आहे.

Advertisement

‘अमेझॅान’ने आपल्या प्राईम सेवासाठी मासिक योजना काढून टाकली आहे. तसे त्यांच्या संकेतस्थळाच्या सपोर्ट पेजवर निर्देशित केले आहे. गेल्या 27 एप्रिलपासून फुकट ट्रायलही बंद करण्यात आले आहे. भारतातील ग्राहकांसाठी एका महिन्यापुरती सदस्यता यापुढे सुरु ठेवता येणार ऩाही.

Advertisement

अमेझॅानला आता फक्त त्रैमासिक (किमान तीन महिने) अथवा वार्षिक सदस्यत्व योजनाच चालवाव्या लागणार आहेत. ‘अमेझॅान प्राईम’ची 129 रुपये प्रति महिना योजना बंद होणार आहे. नव्याने ‘अमेझॅान प्राईम’चे सदस्यत्व घ्यायचे झाल्यास वा चालू सदस्यत्वाचे नुतनीकरण (renew) करायचे असल्यास तीन महिने वा वार्षिक सदस्यत्व स्वीकारावे लागणार आहे. ‘अमेझॅान प्राईम’च्या त्रेमासिक सदसत्वसाठी 329 रुपये, तर वार्षिक सदस्यत्वासाठी 999 रुपयांची योजना आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply