Take a fresh look at your lifestyle.

बाप रे..! खताच्या किमतीत यंदा भरमसाठ वाढ, पहा एका गोणीसाठी किती पैसे लागणार..?

मुंबई : कोरोना (corona) संकटाने सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. व्यापार-उदीम थांबला आहे. बाजारात पैसा फिरत नसल्याने आर्थिक मरगळ आली आहे. दुसरीकडे शेतमालाला भाव नाही. लॉकडाऊनमुळे शेतातील भाजीपाला मातीतच सडला. हातात दोन पैसे नसताना यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यासाठी बि-बियाणे (Seeds), खते,  औषधे लागणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची तजवीज करावी लागेल.

Advertisement

एकीकडे अशी सगळी परिस्थिती असताना, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आहे. यंदा केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या (Fertilizer) किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे. हे दर कमी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे.

Advertisement

रासायनिक खतांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, ही दरवाढ तातडीनं मागं घ्यावी, अशी विनंती कृषीमंत्री भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपूरवठा करु आणि केंद्र सरकारला दरवाढ मागे घ्यायला लावू, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

Advertisement

खतांच्या वाढलेल्या किमती
खत                                  जुना दर              नवा दर
इफको 10:26:26                1175                 1775
इफको 10:32:16                 1190                1800
इफको 20:20:00                975                 1350
डीएपी                                 1875                 1900
आयपीएल डीएपी                1200                 1900
आयपीएल 20:20:00           975                 1400
पोटॅश                                  850                  1000

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply