Take a fresh look at your lifestyle.

‘यंदा कमी पाऊस नि संकटेच अधिक; पण राजा कायम राहील.. ‘ पहा कुणी केलीय भविष्यवाणी..!

पुणे : मे महिना.. उन्हाचा तडाखा ऐन भरात असतो. अंगाची लाहीलाही करणाऱ्या तप्त उन्हातही शेतकरी आपला घाम गाळत असतात. खरीप पिकाची आखणी करीत असतो. त्यासाठी शेताची मशागत सुरु असते. डोळे आकाशाकडे लागलेले असतात. कारण, मॉन्सूनच्या पावसावरच शेतकऱ्याची वर्षभराची सारी भिस्त असते. याच काळात ठिकठिकाणी यात्रा-जत्रेचा मोसम सुरु झालेला असतो. त्यात पुढील वर्ष कसे जाणार, याची भविष्यवाणी केली जाते. आता हवामान विभाग अंदाज वर्तवत असले, तरी शेतकऱ्यांना भविष्यावरच विश्वास असतो..

Advertisement

.. तर यंदाही अशीच एक भविष्यवाणी करण्यात आली असून, त्यात यंदा पाऊसपाणी कमी, तर पृथ्वीवर संकटेच अधिक येणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. आधीच कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात ही भविष्यवाणी करण्यात आल्याने, सर्वसामान्य लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Advertisement

अकोला जिल्ह्यातील जवळपास 300 वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ (Bhendwal) घटमांडणीची ही भविष्यवाणी आहे. आज (ता. १५) पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी ही भविष्यवाणी जाहीर केली.

Advertisement

भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानुसार, यंदा जूनमध्ये कमी पाऊस होईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात सगळीकडे चांगला पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये जून-जुलैपेक्षा कमी पाऊस पडेल. सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस होईल. अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती असू शकते. पीक परिस्थिती साधारण राहील. अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहील. चाराटंचाई निर्माण होईल. त्यामुळे पशुधन संकटात येईल, असे म्हटले आहे.

Advertisement

देशाचा राजा कायम राहील

Advertisement

पृथ्वीवर संकटाची मालिका सुरु राहील. त्यात नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी अशा आपत्तीला तोंड द्यावे लागेल. देशाचा राजा कायम राहील; मात्र त्यालाही प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल. नैसर्गिक संकटांत जीवितहानीची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply