Take a fresh look at your lifestyle.

‘कोरोनालाबी जीवय.. त्यालाबी जगू द्या ना..!’ माजी मुख्यमंत्र्याचे अजब विधान

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात अक्षरशः हाहाकार उडाला आहे. त्यात अनेकांनी आपले जवळचे माणसे गमावली. उद्योग-धंद्याची वाट लावली. कोरोनामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झालेले असताना, काही जणांना अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. अशा लोकांच्या हास्यास्पद वक्तव्यावर हसावे की रडावे, ते काळात नाही.

Advertisement

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, कोरोनाबाबत उत्तराखंडच्या (Uttarakhand) माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान.. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “कोरोना विषाणू हादेखील एक प्राणी आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे.” सोशल मीडियावर (Social Media) माजी मुख्यमंत्र्यांचं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यावरून त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. कोरोनाबाबत अजब विधान करणारे रावत एकटे नाहीत, तर याआधी अनेकांनी अशी विधानं केली आहेत.

Advertisement

एका माध्यमासोबत बोलताना रावत यांनी हे विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “कोरोना विषाणूदेखील एक प्राणी आहे आणि आपणही. आपण स्वतःला सर्वाधिक बुद्धीमान समजतो; मात्र कोरोना विषाणूही जगण्याची इच्छा असेल आणि तो त्याचा अधिकारही आहे. आपण कोरोनाच्या मागे लागलो, तसे तो रूप बदलतोय. तो बहुरुपी झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून अंतर ठेवून राहावं लागेल.”

Advertisement

तू चालत राहा; आम्हीही चालत राहातो. फक्त आपल्याला त्याच्यापेक्षा वेगानं चालावं लागेल. जेणेकरुन तो मागे राहील. तोदेखील एक जीव असून, स्वतःला वाचवण्यासाठी तो वारंवार आपलं रूप बदलत असल्याचे रावत यांचं म्हणणं आहे.

Advertisement

यज्ञ केल्यास कोरोना येणार नाही…

Advertisement

कोरोनाबाबत अशी विधाने करणारे रावत हे काही एकटे नाहीत. मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर त्यांनीही असंच एक विधान केलं होतं. “यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट भारतात येणारही नाही. ही अंधश्रद्धा नाही, तर पर्यावरण शुद्ध करण्याचा उपाय आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सर्व जागरुक आहेत आणि आपण या लाटेवरही मात करू. कारण, जेव्हा सगळे मिळून प्रयत्न करतात, तेव्हा कोणतेही संकट दूर होतात.”

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply