Take a fresh look at your lifestyle.

असे आहे गुजरातचे वास्तव; पहा मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी कशाकडे वेधलेय लक्ष..!

मुंबई : नागपूरचा ऑक्सिजन थेट गुजरातकडे पळवून नेण्यासह अनेकदा लोकसंख्येच्या तुलनेते लस जास्त मिळाल्याचा आरोप गुजरातवर झालेला आहे. इथेही करोना संक्रमण तुलनेने नियंत्रणात असल्याचे आकडे येत आहेत. त्याचवेळी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांप्रमाणे गुजरातमध्येही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा इतर आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. याच मुद्द्याकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे अभ्यासू मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

मंत्री आव्हाड यांनी भास्कर माध्यम ग्रुपच्या दिव्य भास्कर या गुजराती न्यूज पेपरची एक बातमी शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुजराती पेपर दिव्य भास्करची हि हेडलाईन आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे मध्ये ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली. यंदा याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली. दुपट्टीहून अधिक! आणि सरकारी आकडे काय सांगतात? कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाले. बातमी संपली.

Advertisement

(1) Dr.Jitendra Awhad on Twitter: “गुजराती पेपर दिव्य भास्करची हि हेडलाईन आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी १ मार्च ते १० मे मध्ये ५८ हजार डेथ सर्टिफिकेट दिली गेली. यंदा याच काळात तब्बल १ लाख २३ हजार सर्टिफिकेट दिली गेली. दुपट्टीहून अधिक! आणि सरकारी आकडे काय सांगतात? कोरोनामुळे ४२१८ मृत्यू झाले. बातमी संपली. https://t.co/GnUyBiTjjx” / Twitter

Advertisement

गुजरात म्हटलेकी येथील मुख्यमंत्री किंवा इतरही नेते आठवत नाहीत. हे राज्य म्हणजे अनेकांना सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचेच वाटते. तर, काहींना काँग्रेस नेते हार्दिक पटेल आठवतात. याच राज्यातील वास्तव वेगळे असल्याची शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. राजकोट जिल्ह्यातील जेतपूर तालुक्यात संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पांचपीपला गावात महिन्यात 70 जणांच्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण आहे. तथापि, सरकारी आकडेवारीनुसार कोरोनामुळे केवळ 42 मृत्यूची नोंद झाली आहे. भावनगर जिल्ह्यातील योगाठ गावातही 20 दिवसात सुमारे 90 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर, रंधोला गावात अशीच भयानक परिस्थिती निर्माण झाली असून दोन महिन्यांत आत्तापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. दैनिक भास्कर या माध्यम समूहाने यावर प्रकाशझोत टाकल आहे.

Advertisement

तर, सुरत जिल्ह्यातील महुआ तालुक्याच्या शेखपुर आणि परिसरातील पाच गावात 107 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी केवळ 39 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. इतरांचा मृत्यू सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजारांमुळे झाला आहे आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एप्रिलमध्ये या गावात फक्त 3 मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी लॉक सांगतात ते आकडे वेगळे आहेत. शेखपूरचे परिमलभाई यांनी म्हटले आहे की, एका महिन्यात गावात 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 जणांनी कोरोना टेस्ट केली होती. बाकीचे लोक सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजारांमुळे मरण पावले आहेत. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. बामनिया गावचे सरपंच म्हणाले की, आमच्या गावात एका महिन्यात 22 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 10 जणांचा कोरोना येथे मृत्यू झाला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply