Take a fresh look at your lifestyle.

सायबर ठगांचा प्रताप; साईभक्तांना घातलाय ‘त्या’ पद्धतीने मोठा गंडा

अहमदनगर : धर्म आणि देवाच्या नावाखाली देशभरात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात लुट चालू असते. सध्याच्या करोना काळात त्याला काहीअंशी आळा बसल्याचे दिसत असतानाच सायबर ठगांनी नवा मार्ग अवलंबून आता भाविकांची लुट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी साईभक्तांनाच्या भावनेला हात घालून गंडा घातला आहे.

Advertisement

त्यासाठी या सायबर ठगांनी (Cyber Crime) चक्क ‘श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी’ याच नावाने एक बनावट खाते तयार केऊन घेतले आहे. या बनावट संस्थेच्या खात्यामार्फत ‘गुरुवारचे अन्नदान’ करण्यासाठी म्हणून देशभरातून मोठ्या प्रमाणात देणगी घेतली आहे. शिर्डी संस्थानचे (Shirdi Sai Baba Trust) मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचा कुठलाही संबंध याच्याशी नाही.

Advertisement

गुरुवारचे अन्नदान’ म्हणून पेटीएम (PayTM) व गुगल पे (Google Pay) द्वारे ऑनलाइन देणगीची (Online Donation) मागणी करत भाविकांची लूट केली असल्याचे पाहून शिर्डी संस्थानाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संस्थानाने आवाहन केले आहे की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीस देणगी तसेच अधिक माहितीसाठी संस्थानच्या http://www.sai.org.in व online.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Advertisement

असंख्य साईभक्त श्री साईप्रसादालयात अन्नदानासाठी थेट अथवा ऑनलाईन देणगी देतात. त्याचाच गैरफायदा उठवण्याच्या उद्देशाने भाविकांच्या भावनेला हात घालून सायबर ठगांनी नामसाधर्म्य असलेले खाते उघडून ही फसवणूक केली आहे. नावाशी साधर्म्य असलेल्या बनावट संस्था वेबसाईट, फेसबुक आदी ऑनलाइन माध्यमांतून फसवणूक करुन देणगी जमा करत असल्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याने संस्थानाने याबाबत ही माहिती दिली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply