Take a fresh look at your lifestyle.

‘भारतात ३३ कोटी देव असतानाही ऑक्सिजनची कमतरता..’, पहा कोणी उडवलीय खिल्ली..?

नवी दिल्ली : ‘शार्ली हेब्दो’ हे नाव ऐकलेय का..? हे फ्रान्सचे एक मासिक आहे. या मासिकानं बर्‍याचदा धार्मिक विषयांवर व्यंगचित्रांद्वारे टीका-टिप्पणी केली आहे.

Advertisement

मुस्लीम धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र या मासिकानं छापलं होतं. त्यानंतर काही जणांनी या मासिकाच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यात या मासिकाचे अनेक वरिष्ठ व्यंगचित्रकार ठार झाले होते. मात्र, त्यानंतरही मासिकानं आपली भूमिका बदलली नाही. आता या मासिकाने भारतातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत टीका करताना हिंदू धर्मातील श्रद्धेला लक्ष्य केले आहे.

Advertisement

https://platform.twitter.com/widgets.js
एप्रिलमध्ये ‘शार्ली हेब्दो’ (Charlie Hebdo) मासिकाने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यात हिंदूंच्या श्रद्धेचा उपहास करताना, असे म्हटले होते, की ‘भारतात 33 कोटी देवता असतानाही कोणालाही ऑक्सिजनची कमतरता भरून काढता येत नाही..’ या व्यंगचित्रात मोठ्या संख्येनं लोक ऑक्सिजन सिलिंडर्ससह खाली पडलेले दिसत आहेत.

Advertisement

विश्वात एकंदरीत 33 कोटी देवता असल्याची हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. मात्र, या मासिकानं ‘33 million’ म्हणजे 33 दशलक्ष किंवा 3.3 कोटी असे लिहिले आहे. हे चित्र ‘शार्ली हेब्दो’ने खरंच प्रसिद्ध केलं का, याची शहानिशा झालेली नाही.

Advertisement

भारतातल्या काही जणांनी हे चित्र शेअर केल्यावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. यापूर्वी ‘शार्ली हेब्दो’ मासिकाने मुस्लिम समाजाचा वाद ओढवून घेतला होता. आता हिंदू धर्माविषयी टिप्पणी करून त्यांनी हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे.

Advertisement

अनेक भारतीयांनी या चित्रावर संताप व्यक्त केला आहे. ‘शार्ली हेब्दो’ मासिकानं हे व्यंगचित्र ‘फेसबुक’ (Facebook) अकाऊंटवरून शेअर केलं आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी ते शेअर केलं आहे. या व्यंगचित्राचा भारतातील बर्‍याच लोकांनी निषेध केला आहे. बर्‍याच लोकांनी भारताच्या आरोग्य सेवेवर टिंगल करण्याऐवजी हिंदू समाजाची खिल्ली उडविणारे असल्याचे म्हटलं आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply