Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणासाठी आता मोदी सरकारच सरसावले, पहा काय केलंय..?

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त होत होता. चोहोबाजूने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. राष्ट्रपती आणि मोदी सरकारला पत्रही लिहिलं. तसेच, गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.

Advertisement

दरम्यान, आता मोदी सरकारनेच मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. केंद्र सरकार व विनायक मेटे यांनी एकत्रित सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्येही एसइबीसी (SEBC)तील जाती-जमाती ठरवू शकतात. कलम 324 -A चा अन्वयार्थ चुकीचा आहे. राज्यांना फक्त राष्ट्रपतींकडे शिफारशीचे अधिकार असल्याचंही केंद्र सरकारनं याचिकेत स्पष्ट केल आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्रालाच SEBC संबंधी अधिकार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरच मोदी सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केलीय.

Advertisement

राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांकडे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने फेरविचार याचिकेतून सर्वोच्च न्यायालयात मांडलीय.

Advertisement

केंद्र सरकारचे आभार : फडणविस
याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आरक्षण ठरवण्याचा अधिकार राज्यांकडेच आहेत. केंद्राने ते स्वतःकडे घेतलेले नाहीत. आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातसुद्धा केंद्र सरकारने हीच भूमिका घेतली. आम्ही वारंवार हेच सांगत होतो. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनीसुद्धा मान्य केली आहे. तातडीने फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply