Take a fresh look at your lifestyle.

कोविड 19 अपडेट : अमेरिकन विद्यापीठाने केलाय भारत-रशियावर ‘तो’ गंभीर आरोप..!

पुणे : सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या आहे. करोना भारतात आल्यापासून महाराष्ट्राने याबाबतीत आपला पहिला क्रमांक दुर्दैवाने पहिलाच राखला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात कोविड 19 रुग्ण आणि मृत्यूचे आकडे कमी दाखवले जात असल्याचा आरोप अनेकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, उत्तर भारतीय राज्यांमध्ये करोनाचे आकडे लपवले जात असल्याचे वास्तव अनेक माध्यम समूहांनी दाखवून दिलेले आहे. त्याच धर्तीवर आता अमेरिकन विद्यापीठानेही भारतावर असाच आरोप केला आहे.

Advertisement

करोना मृत्यू आणि रुग्णसंख्या यामध्ये युरोप-अमेरिकेची आघाडी पहिल्यापासून कायम आहे. तर, चीनसह इतर ठिकाणी रुग्णसंख्या आश्चर्यकारक पद्धतीने कमी झालेली आहे. या प्रत्येकाने साथीच्या आजारामध्ये देश, राज्य आणि कुटुंबीयांनी काही ना काही गमावले आहे. परंतु अनेकांचे मृत्यू सरकारी आकडेवारीत अर्थात कोरोना टेबलमध्ये नोंदवले जाऊ शकलेले नाहीत. कारण जवळजवळ सर्वच मोठ्या देशांनी कोरोनामुळे मृत्यूची योग्य आकडेवारी लपविली आहे, असाच दावा वॉशिंग्टनच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इन्स्टिटय़ूटने केला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder #politics #GujaratCoronaUpdate https://t.co/csKY6sTmgO” / Twitter

Advertisement

या संस्थेने केलेल्या विश्लेषणामध्ये हा दावा केला गेला आहे. त्यानुसार, व्लादिमिर पुतीन यांच्या रशियामध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत देशासह मेक्सिको देशात वास्तविक आकडेवारी दुप्पट आहे. त्याचबरोबर जगातील सरकारी आकडेवारीपेक्षा एकूण मृत्यू तब्बल ११३% जास्त असल्याचा दावाही या अहवालात केलेला आहे. दाव्याच्या समर्थनार्थ संशोधकांनी 6 प्रमुख बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्या अशा :

Advertisement
  1. प्रथम – कोरोनामधील मृत्यू थेट कमी झाले आहते. विशेषत: ज्या भागात पुरेशा चाचण्या होत नाहीत तिथे आकडे खूप कमी झालेले आहेत.
  2. दुसरे म्हणजे, कोरोना रुग्णांसाठी हेल्थकेअर सिस्टम योग्य प्रकारे वापरली जात नव्हती.
  3. यातील तिसरा मुद्दा म्हणजे पुष्कळ रूग्णांनी चिंता आणि नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे पुरावे आहेत. हे कोरोनामुळे मृत्यू मानले गेले नाही. अमेरिकेतही असे रुग्ण 15,000 होते.
  4. चौथा – रहदारी थांबल्यामुळे अपघाती मृत्यू कमी झालेत, मात्र तरीही एकूण मृत्यूची संख्या वाढली आहे.
  5. पाचवा – इन्फ्लूएन्झा, न्यूमोनिया किंवा श्वसन रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट आहे. तर, संक्रमणामुळे वाढली आहे.
  6. सहावा मुद्दा – हृदयरोग किंवा तीव्र श्वसन रोगामुळे मृत्यूचा धोका जास्त होता. त्यांच्या कोरोना मृत्यूचे प्रमाण 2-3% कमी दाखवले आहे.

घरात किंवा रुग्णालयाबाहेरील मृत्यूंचा सरकारी डेटामध्ये समावेश नव्हता. कमी चाचणी घेतल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. ते कोरोनामुळे मृत्यू मानले गेले नाहीत. त्यामुळे या अहवालामधील दाव्याला अनेकांनी शेअर केले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply