Take a fresh look at your lifestyle.

‘चाक-हाओ’ खाण्याचे ‘हे’ आहेत भन्नाट फायदे; आरोग्यदायी आणि पोषक घटकांनी युक्त आहे की हा..!

मणिपूर मध्ये पिकवला जाणारा काळा सुगंधी तांदूळ (चाक-हाओ) सध्या खुप चर्चेत आहे. ब्लॅक अरोमॅटिक तांदूळ (Black Aromatic Rice) यास मणिपुरी भाषेत चाको-हाओ असे म्हणतात. चाक-हाओ हा भात त्याच्या आकर्षक रंगाने आणि सुगंधित चविसाठी परिचित आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि इतर पौष्टिक गोष्टी आहेत. विदर्भात काळ्या भात पिकाच्या लागवडीचे प्रयोग सध्या सुरु झाले आहेत. चाक-हाओ भाताचे मानवी आरोग्याला खुप सारे फायदे आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळात चाक-हाओ तांदळाचा अग्रक्रम आहे. विशेष बाब म्हणजे या तांदळाला भारतीय बाजारात सर्वाधिक दर मिळतो आहे. त्यामुळेच देशभरातल्या भात उत्पादक पट्ट्यात चाक-हाओ भात लागवडीचे प्रयोग सुरु झाले आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “भले शाब्बास ..! कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या कुटुंबाना दोन वर्षे पगार, मुलांचे शिक्षणही करणार ‘ही’ कंपनी..! @krushirang #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #bajajauto https://t.co/NUyWHHgCR0” / Twitter

Advertisement

मणिपूरच्या या काळ्या सुगंधित तांदळाचे वैशिष्टये म्हणजे त्याची चव व सुगंध आणि चिकटपणा हे जगातील इतर भागांमध्ये पिकविलेल्या इतर काळ्या तांदळामध्ये दिसत नाही. यात पांढऱ्या आणि तपकिरी भातांपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असलेले हे तांदूळ असल्याचे मानले जाते. काळ्या तांदळाचे सेवन केल्यास एथेरोस्क्लेरोसिस, मधुमेह, अल्झायमर रोग, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, संधिवात, वृद्धत्वाची चिन्हे आणि अगदी कर्करोग अशा आजारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनास हातभार लावतो.

Advertisement

चाक-हाओ भाताचे फायदे

Advertisement
 • भात पिकातील फायटो केमिकलमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. त्याचबरोबर हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अर्थो स्क्लेरोसिस फ्लेक फॉर्मेशन नियंत्रित होते. परिणामी हृदय विकार होण्याचे प्रमाण कमी होते.
 • भातातील ॲंथोसायनिन घटक शरीरात कर्करोगाच्या पेशीची वाढ होऊ देत नाही.
 • भातात साखरेचे प्रमाण अत्यल्प आहे. मधुमेहाचे रुग्ण सदर भाताचा नियमित अस्वाद घेवू शकतात.
 • त्वचा तजेलदार होते.
 • डोळे निरोगी होतात.
 • पचनक्रीया सुधारते.

चाक-हाओ भाताचे वैशिष्ट्ये

Advertisement
 • रोपे जमिनीत खोलवर रुजतात. स्थानिक भात पिकापेक्षा चाक-हाओ भाताची उंची अधिक असते. तरीही या भाताचे पिक वाकत नाही.
 • लागवड केल्यापासून ते काढणी पर्यंत पिकाच्या रंगात अनेक बदल होतात.
 • पिकाला गहु पिकासारख्या लोंब्या येतात.

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement
 • दर : भारतीय बाजारात चाक-हाओ तांदळाला १८०० ते २००० रुपये दर मिळतो आहे.
 • ब्रॅंडींग : मणिपूरचा कृषी विभागा चाक-हाओ तांदळाचे ब्रॅंडींग करत आहे. शासकीय यंत्रणा ब्रॅंडींग करत असल्याने भारतात चाक-हाओ भाताचा झपाट्याने प्रसार होतो आहे.

Krushirang on Twitter: “बापरे.. इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाढला की युद्धाचा धोका; जमिनीच्या वादाला मिळाले धर्माचेही अधिष्ठान..! #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #IsraelPalestine #IsraelUnderFire #IsraeliAttackonAlAqsa https://t.co/AoNNzj1ZiP” / Twitter

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply