Take a fresh look at your lifestyle.

पावसाची वर्दी..! पुढील तीन दिवसांत होणार ‘इथे’ पाऊस..

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा (Low pressure over Arabian Sea) तयार झाल्याने पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यामुळे कोकण, मुंबईलगतच्या समुद्रातून १८ मे रोजीच्या संध्याकाळी हे चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल. या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता.१४) कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल. कोकण, गोव्यात 15 मे रोजी पावसाची शक्यता आहे.चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.

Advertisement

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. विदर्भ- मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी
  • कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा
  • रायगड – मोठा पाऊस
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
  • विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

सुदैवाने कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जात असले, तरी मुंबईला त्याचा धोका नाही. मात्र, मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यात चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. रायगड जिल्ह्यात मोठा पाऊस होईल. या काळात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply