Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाढला की युद्धाचा धोका; जमिनीच्या वादाला मिळाले धर्माचेही अधिष्ठान..!

दिल्ली : इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील जमिनीच्या वादाला अगोदरच वांशिक संघर्षाचे स्वरूप मिळाले आहे. इस्राइलने दुसऱ्या महायुद्धानंतर या भागावर कब्जा केल्याचा मुद्दा आता मागे पडून या वादाला थेट धार्मिक अधिष्ठान मिळण्यास सुरुवात झालेली असतानाच आता याला आणखी विखारी फळ येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता तुर्कस्तान हा देश पॅलेस्टाईनच्या लोकांच्या बाजूने मुस्लीम राष्ट्रांना एकीची साद घालत आहे. तर, तिकडे श्रीमंत राष्ट्रांच्या मदतीने इस्राइल युद्धासाठी सज्ज झाला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

इस्त्राईल आणि हमासचे छोटेखानी युद्ध आता मोठ्या युद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हमास आणि इस्राईलमधील परस्पर हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 103 लोक मरण पावले आहेत. यात 27 मुलांचादेखील समावेश आहे. या चकमकीत 580 लोक जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांपैकी 7 इस्राएलचे आहेत. बाकीचे पॅलेस्टाईनचे आहेत. इस्त्राईलच्या जोरद हवाई हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाले आहेत. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगान यांनी मुस्लिम देशांना इस्रायलच्या विरोधात एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही इस्रायलला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

Advertisement

युद्धाबरोबर दंगलीचा सामना करणाऱ्या इस्त्रायली पोलिसांनी आता दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. संरक्षणमंत्री बेनी गॅन्ट्झ यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धानंतर इस्रायलच्या बर्‍याच शहरांमध्ये यहुदी आणि अरबी वंशाच्या लोकांमध्ये दंगली होत आहेत. सर्वात जास्त दंगलीची प्रकरणे जेरुसलेम, लॉड, हाइफा आणि सखानिन शहरांत झाली आहेत. लॉड शहरात आणीबाणी लागू करावी लागली. 1996 नंतर दंगलीमुळे आणीबाणी लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder #politics https://t.co/9AMeFvGTeQ” / Twitter

Advertisement

गाझा पट्टीजवळ इस्रायलने आपले सैन्य आणि रणगाडे तैनात करण्यास सुरवात केली आहे. एअरफोर्सने देखील आकाशात फिरत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी सज्ज आहोत, असे लष्कराचे प्रवक्ते जॉन कॉनिक्रस यांनी शुक्रवारी सांगितले. इस्त्रायली सैन्याने सांगितले की गाझा पट्टीवरून आतापर्यंत 1750 रॉकेट गोळीबार करण्यात आली आहेत. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायली सैन्याने 600 हवाई हल्ले केले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply