Take a fresh look at your lifestyle.

इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्ष : चीनने बोलवलेल्या बैठकीत अमेरिकेचा खोडा; पहा काय दिलेय याबाबत उत्तर

दिल्ली : इस्त्राईल आणि हमासचे छोटेखानी युद्ध तातडीने बंद करून या भगर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन भारत सरकारसह अनेकांनी केले आहे. त्याचवेळी जगभरात या दोन्ही बाजूने अनेकांनी सोशल मीडियामध्ये लढाईस सुरुवात केल्याने हा वाद चिघळायला लागला आहे. परिणामी आता यास मोठ्या युद्धाचे स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच चीनने याप्रकरणी बोलवलेली युनोच्या सुरक्षा परिषदेची बैठक अमेरिकेच्या विरोधामुळे रद्द झाली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “बापरे.. इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाढला की युद्धाचा धोका; जमिनीच्या वादाला मिळाले धर्माचेही अधिष्ठान..! #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #IsraelPalestine #IsraelUnderFire #IsraeliAttackonAlAqsa https://t.co/AoNNzj1ZiP” / Twitter

Advertisement

हमास आणि इस्राईलमधील परस्पर हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 103 लोक मरण पावले आहेत. यात 27 मुलांचादेखील समावेश आहे. या चकमकीत 580 लोक जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांपैकी 7 इस्राएलचे आहेत. बाकीचे पॅलेस्टाईनी नागरिक इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यामुळे जगभरातून अनेकांनी या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी काही राष्ट्र आणि धार्मिक संघटना यामध्ये तेल ओतण्याचे काम करून लढाईला मोठे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Advertisement

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाची (यूएनएससी) बैठक अमेरिकेने रोखली आहे. या सभेत शांतता साधण्याच्या प्रकरणी कोणताही फायदा होणार नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनच्यावतीने ही बैठक बोलविण्यात आली होती. त्याचबरोबर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी मुस्लिम देशांना इस्रायलच्या विरोधात एकत्र करणे सुरू केले आहे. त्यांनी गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही फोन केला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

इस्राईल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्दय़ावर ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) देखील सक्रिय झाली आहे. या विषयावर तुर्की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांनी संयुक्त राष्ट्राची बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. ज्यास ओआयसीने मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही बर्‍याच निरपराध लोकांचा बळी गेला असल्याने या लढ्यामुळे दोन्ही देशांमध्ये धर्मांधता वाढेल, असे गुटेरेस म्हणाले आहेत.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply