Take a fresh look at your lifestyle.

अक्षय्य तृतीयेला ‘असा’ राहिला सोन्याचा दर, कोरोनामुळे ‘अशी’ झाली खरेदी..!

मुंबई : अक्षय्य तृतीया.. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.. हिंदूंसाठी एक महत्वाचा सण. या दिवशी मोठ्या जोमात खरेदी केली जाती. त्यातही महिला वर्ग तर खास या दिवसाची वाट पाहून असतो. कारण, या दिवशी केलेली सोने खरेदी फलदायी असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी किमान एक ग्रॅम तरी सोनेखरेदी केलीच जाते. अक्षय्य तृतीयाला सोन्याची खरेदी केल्यास घरात देवी लक्ष्मी निवास करते, घरात समृद्धी येते, असं म्हटल जातं.

Advertisement

कोरोनामुळे यंदा बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे यंदा महिलांना सोने खरेदीचा आनंद लुटता आला नाही. काहींनी दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न केला. काही ज्वेलर्सनी ऑनलाइन सोने खरेदीची संधी उपलब्ध करून दिली होती, त्यासाठी खास ऑफर्स जाहीर केल्या होत्या.

Advertisement

कोरोना संकटात आलेल्या या सणाच्या दिवशी राज्यात ठिकठिकाणी सोन्याचे दर काय राहिला? त्यातून किती सोने खरेदी झाली, सोने-चांदी स्वस्त होते की महाग? याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

काही शहरातील सोन्याचे (प्रति तोळा) व चांदीचे (प्रति किलो) दर

Advertisement

शहर                सोने                   चांदी
नागपूर          45750                71100
नाशिक         47900                71800
पुणे              48550                72130
मुंबई            45490                72130

Advertisement

भावात बदल नाही
अक्षय्य तृतीया असतानाही आज (ता.14) सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही. भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 720 रुपये तोळा, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 720 रुपये इतका होता. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45 हजार 900, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 49 हजार 900 इतका राहिला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply