Take a fresh look at your lifestyle.

थोरातांचे संगमनेर बनतेय करोना हॉटस्पॉट; पहा अहमदनगर जिल्ह्यात कुठे आहे जास्त रुग्णसंख्या

अहमदनगर : शहरी भागामध्ये कमी आणि ग्रामीण भागात जास्त रुग्णसंख्या अशी उलट परिस्थिती सध्या अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामध्येही उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या अनेकांसाठी डोकेदुखी बनली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहर आणि जिल्यात सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

Advertisement

आज (दि. १४ मे २०२१) जिल्ह्यात ३ हजार ४९४ नवे करोनाबाधित आढळून आले आहे. एकूण बाधितांमध्ये संगमनेर, अकोले, राहुरी, नगर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २ हजार ००३ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार १६० रुग्ण बाधीत आढळले.

Advertisement

पहा कुठे किती सापडले आहेत रुग्ण :

Advertisement
 • संगमनेर – ४४९
 • अकोले – ३८८
 • राहुरी – ३०४
 • नगर ग्रामीण – २८५
 • श्रीरामपूर – २६४
 • मनपा – २४१
 • पारनेर – २३३
 • राहाता – २३१
 • श्रीगोंदा – २११
 • नेवासा – १९८
 • पाथर्डी – १५८
 • शेवगाव – १५७
 • कोपरगाव – १५२
 • कर्जत – १०४
 • जामखेड – ७२
 • इतर जिल्हा – २६
 • कॉंटेन्मेन्ट – १६
 • इतर राज्य – ०३
 • मिलिटरी हॉस्पिटल – ०२

संपादन : महादेव गवळी

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply