Take a fresh look at your lifestyle.

भले शाब्बास ..! कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या कुटुंबाना दोन वर्षे पगार, मुलांचे शिक्षणही करणार ‘ही’ कंपनी..!

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसरी लाट प्रचंड मोठी विनाशकारी ठरत आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे उद्योग-धंदे बसले. उघड्यावर आले. मात्र, अशा संकटातही काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांची काळजी घेत आहेत. अशाच काही कंपन्यांत ‘बजाज उद्योग समूहा’चं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल. ही कंपनी आपल्या कर्मचाऱयांमागे भक्कमपणे उभी तर राहिलीच; मात्र दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झालाच, तर त्यानंतरही त्याच्या कुटुंबाची काळजी घेत आहे.

Advertisement

भारतातील एक नामंकित उद्योगसमूह म्हणून ‘बजाज ग्रुप’ ओळखला जातो. तर या ग्रुपच्या ‘बजाज ऑटो लिमिटेड’ (Bajaj Auto Ltd)ने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. त्यानुसार, ‘बजाज ऑटो’मधील कायम असणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंतचा पगार देण्यात येईल. तसेच, त्या कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च करणार असल्याचे ‘बजाज’नं जाहीर केल आहे.

Advertisement

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये ‘बजाज ऑटो’नं असं म्हटलं आहे, की कोरोना काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पगाराची रक्कम जी दरमहा 2 लाखापर्यंत असेल, ती त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. शिवाय त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुबीयांच्या नातेवाईकांचा 5 वर्षांचा वैद्यकीय विमादेखील काढण्यात येईल. तसेच, दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार आहे. मुलाच्या 12 पर्यंतच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये दरवर्षी दिले जातील. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी 5 लाखांचा खर्च बजाज ऑटो करणार आहे.

Advertisement

सोबत कंपनीने असं म्हटलंय, की कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आम्ही सर्व काळजी घेत आहोत. कोरोनापासून सुरक्षेसाठी सुविधा, टेस्टिंग आणि रुग्णालय सुविधा, कोरोना लसीकरण शिबीर, असे उपक्रम राबवत आहोत.

Advertisement

‘बोरोसिल’, ‘मुथूट फायनान्स’चाही पुढाकार
बजाज ऑटोपूर्वी ‘बोरोसिल अँड बोरोसिल रिन्यूवेबल्स’ आणि मुथूट फायनान्स यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवाय कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करण्याची तयारी दाखवली होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply