Take a fresh look at your lifestyle.

इस्राइल सैन्याने केलेय पॅलेस्टाईनच्या ‘त्या’ भागाला केलेय लक्ष्य; पहा कुठे हल्ला करून केलाय मोठा विध्वंस

जेरुसलेम : इस्त्राईल-पॅलेस्टाईनमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून इथे कोणत्याही क्षणी मोठ्या युद्धाचा उद्रेक होण्याचा धोका आहे. पॅलेस्टाईन गट हमासने गाझामधून 1700 रॉकेट उडवून प्रत्युत्तर दिल्यानंतर संतापाचा उद्रेक झालेल्या इस्रायलने भयंकर नागरी भागात हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने गाझा सीमेवर हजारो सैन्य आणि रणगाडे तैनात केले आहेत. दुसरीकडे, 160 इस्त्रायली विमाने गाझा शहरातील हमासचा भाग असल्याचा दावा करून हल्ले करीत आहेत.

Advertisement

Navbharat Times नवभारत टाइम्स – YouTube

Advertisement

ताज्या घटनेत इस्त्रायली लढाऊ विमान, रणगाडे आणि तोफांनी पॅलेस्टाईनमधील मेट्रो बोगद्यावर हल्ला करून कित्येक किलोमीटरपर्यंतचा भाग उद्ध्वस्त केला आहे. इस्त्रायली लष्कराने निवेदन जारी केले की, सुरक्षा दलांनी हमासच्या 150 ठिकाणांना लक्ष्य केले. इस्राईलमध्ये घुसखोरी करण्यासाठी हमासचे सदस्य गाझा शहरातून बोगदे बनवतात. अशा ठिकाणांना यामध्ये लक्ष्य केले गेले. दरम्यान, यहुदी आणि अरब वंशाच्या लोकांमध्ये इस्रायलच्या बर्‍याच शहरांमध्ये दंगल सुरू झाली आहे आणि लोकांनी एकमेकांना मारण्यास सुरवात केली आहे.

Advertisement

शुक्रवारी इस्त्रायली रणगाडे आणि हजारो सैन्य गाझाच्या सीमेवर पोहोचले आहेत. ते पॅलेस्टाईनच्या प्रदेशात गोळीबार करीत आहेत. इस्राईलने आपल्या 9 हजार राखीव सैनिकांना हमासविरोधात जोरदार कारवाईसाठी उतरवले आहे. प्रत्युत्तर म्हणून हमासकडून रॉकेट हल्ला होऊ शकेल अशीही भीती इस्त्राईलला आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, हमासला मोठी किंमत मोजावी लागेल भयंकर हल्ले तर, हमास लष्कराचे प्रवक्ते अबू ओबीदा यांनी म्हटले आहे की, त्यांचा गट इस्त्रायली हल्ल्याला जुमानत नाही नाही. उलट यामुळे इस्त्राईलच्या सैनिकांना जिवंत किंवा मृत पकडण्याची संधी मिळेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply