Take a fresh look at your lifestyle.

स्वस्तात करा सोनेखरेदी, मोदी सरकारने आणलीय ‘ही’ खास योजना

नवी दिल्ली : कोरोनामुळे सध्या सर्वत्र आर्थिक मंदीचे ढग जमा झाले आहेत. अशा काळात नेमकी कुठे गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, सध्या तरी सोन्याशिवाय चांगला पर्याय समोर दिसत नाही. आता जर तुम्ही स्वस्तात सोनेखरेदी (Gold Price Today) करणार असाल, तर मोदी सरकारने तुमच्यासाठी खास योजना आणली आहे. त्यात गुंतवणूक केल्यास तुमचा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे, बाजारभावापेक्षा (Gold Market Price) कमी किंमतीत तुम्हाला सोनं खरेदी करता येणार आहे.

Advertisement

केंद्रातील अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) दिलेल्या माहितीनुसार, मे ते सप्टेंबर, या काळात सहा टप्प्यांमध्ये ‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) जारी केले जाणार आहेत. त्यातील पहिला टप्पा 17 ते 21 मे दरम्यान, तर त्यापुढील टप्पा 24 ते 28 मे दरम्यान असणार आहे.

Advertisement

आरबीआयच्या (RBI) माध्यमातून सरकारकडून हे ‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’ जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी करणे हा आहे. या प्रकारच्या सोन्याच्या खरेदीत तुम्हाला प्रत्यक्ष सोने मिळत नाही. हे सोने ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरुपात मिळते. त्यामुळे त्याच्या शुद्धतेबाबतही फसवणूक होण्याची शक्यता नसते. सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती.

Advertisement

‘आरबीआय’च्या माहितीनुसार, ‘भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेड’ यांच्याकडून ‘गोल्ड बाँड’ जारी केले जातात. त्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. त्यामध्ये तुम्ही एक ग्रॅमच्या पटीत गुंतवणूक करू शकता. या ‘बाँड्स’चा ‘मॅच्यूरिटी पीरिएड’ 8 वर्षांचा असतो. मात्र, 5 वर्षांनी ‘प्री-मॅच्यूअर विड्रॉल’ करता येते.

Advertisement

बँका, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त),स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडलेले पोस्ट आणि एनएसई, तसेच बीएसईच्या माध्यमातून ‘गोल्ड बॉण्ड’ची विक्री होते. कोणत्याही ठिकाणी तुम्ही बाँड योजनेत सामील होऊ शकता. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो ‘गोल्‍ड’साठी गुंतवणूक करू शकतात.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply