Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून ‘त्या’ने फेकली थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरूनच उडी..!

नांदेड / हिंगोली : करोना काळातील भीतीच्या वातावरणात अनेक नवनव्या आणि गमतीशीर घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातही घडली आहे. येथील शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णास भेटण्यासाठी गेलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाने अधिकारी येताच थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजता घडला.

Advertisement

कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबतच नातेवाइकांची गर्दी होऊ लागल्याने अनेकांनी याकडे लक्ष वेधले होते. नातेवाईकच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू लागल्याने यास आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना कोविड वॉर्डमध्ये थांबण्यास मनाई केली आहे. त्यांच्या सरप्राइज व्हिजिटमध्ये आढळून आलेल्या नातेवाइकांना थेट लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. आता आपल्यालाही लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात जावे लागणार असल्याच्या भीतीने वैभव सरकटे (वय ३०, रा. समगा) आहे उडी फेकलेल्या तरुणाचे नाव आहे.

Advertisement

वैभव सरकटे हा रुग्ण असलेल्या आजोबाला भेटण्यासाठी कोविड वॉर्डमध्ये आला होता. जिल्हाधिकारी जयवंशी हेही त्याचवेळी नेमके रुग्णालयात आल्यानंतर आता आपल्याला पकडून विलगीकरण कक्षात दाखल करतील या भीतीने त्याने थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी फेकली. यामध्ये त्याच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली, तर डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली. आता त्याच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना मात्र, त्याचा अजूनही अधिकृतरीत्या जबाब न आल्याने कागदोपत्री याची नेमकी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply