Take a fresh look at your lifestyle.

पथ्यपाणी : उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खायचे टाळा; नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

पावसाचे वेध लागलेले असतानाच कडाक्याचा उन्हाळाही कायम आहे. दुपारच्या वेळेस कडाक्याचे उन पडत असल्याने तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्मा वाढला की काही आजार डोके वर काढतात. अशा वेळी व्यायाम, योग्य आहार आणि काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात घराबाहेर पडण्या अगोदर विशेष काळजी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्यात आहार कसा असावा, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

उन्हाळ्यात शक्यतो मसालेदार पदार्थ टाळावेत कारण मसालेदार पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते. उन्हाळ्यात तेलकट आणि तळलेले खाणे पूर्णपणे टाळलेच पाहिजे. उन्हाळ्यात आहारात जास्त तेलकट पदार्थ घेतले तर आपला चेहरा देखील तेलकट दिसतो. उन्हाळ्यात चहा आणि कॉफी पिणे टाळले पाहिजे त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, जिरे पाणी, ताक घेऊ शकता. उन्हाळ्यात गार पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. परंतु, गार पाणी पिणे शक्यतो टाळले पाहिजे. गार पाण्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसात भूक कमी लागते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात योग्य आहार घेण्याची आवश्यकता आहे. पचायला हलका व कमी आहार घ्यावा. पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. आहारात सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे यांसारखी फळे खावीत. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य घ्यावे. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावे.

Advertisement

दरम्यान, उन्हाळ्यातील किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल बांधावा. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावे. त्वचा कोरडी व निस्तेज होते. उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा. करोनाच्या कालावधीत योग्य पथ्यपाणी पाळा. कारण, सध्या आजारी पडणे कोणालाही परवडणारे नाहीच की..

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply