Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात पाळा ‘असे’ पथ्यपाणी; पहा नेमकी काय घ्यावी खाण्यात काळजी

साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात, जंतुसंसर्ग – डायरिया, डिसेंट्री, कावीळ, टायफॉईड असे आजार होतात. लहान मुलांमध्ये जंतूसंसर्ग, गोवर, कांजण्याचे प्रमाण दिसते. कंजक्टिव्हायटीस हा डोळ्यांचा आजारही या काळात होण्याची शक्यता असते. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमान वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात आरोग्य विभागाकडून सुद्धा विशेष काळजी घेण्यात येते. सरकारी दवाखान्यात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात येतो. या कक्षात कुलर तसेच खिडक्यांना वाळ्याचे पडदे बसवून वातावरण थंड ठेवले जाते. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना येथे ठेवले जाते.

Advertisement

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी पेशंटला थंड वातावरणात ठेवावे. अशा पेशंटनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या पेशंटला घरात एकटे सोडू नये. थंड पाण्याचा वापर करावा, लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे, उन्हात घराबाहेर पडू टाळावे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

असा असावा आहार : उन्हाळ्याच्या दिवसात भूक कमी लागते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात योग्य आहार घेण्याची आवश्यकता आहे. पचायला हलका व कमी आहार घ्यावा. पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. आहारात सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे यांसारखी फळे खावीत. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य घ्यावे.

Advertisement

उन्हाळ्यातील किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल बांधावा. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावे. त्वचा कोरडी व निस्तेज होते. उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा. सुती, मुलायम तसेच सौम्य रंगाचे कपडे असावेत. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावे. तसेच फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Krushirang on Twitter: “भले शाब्बास ..! कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या कुटुंबाना दोन वर्षे पगार, मुलांचे शिक्षणही करणार ‘ही’ कंपनी..! @krushirang #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #bajajauto https://t.co/NUyWHHgCR0” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply