Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून कर्जत-जामखेड होणार ‘ऑक्सीजन हब’; पहा काय म्हटलेय रोहित पवारांनी

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन तुटवड्याचे संकट ओढवले आहे. यासाठी खासगी व सरकारी आरोग्य यंत्रणेसह सरकारलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी कोणत्याही कठीण प्रसंगी मदतीला धावणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड तालुक्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यास जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी मिळाल्याने हे दोन्ही तालुके जिल्ह्यातील ऑक्सीजन हब म्हणून आता नावारूपास येणार आहेत.

Advertisement

याबाबत माहिती देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ऑक्सीजनच्या कमरतेमुळे सर्वच वैद्यकीय यंत्रणांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. येत्या काळात कर्जत व जामखेड तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा या नियोजनातून कर्जत जामखेडमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा प्रशासन व महाविकास आघाडी सरकारने सहकार्य केल्याने हा प्रकल्प साकार होत आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “आला की अहमदनगर महापालिकेचा निर्णय; पहा नेमके काय म्हटलेय आदेशामध्ये @krushirang #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #ahmednagar #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinde https://t.co/w3CrCe9hsY” / Twitter

Advertisement

कर्जतमध्ये १२०० एलपीएम व जामखेडमध्ये ६५० एलपीएम ऑक्सीजन निर्मिती होणार असून या प्रकल्पातून कर्जत येथे २५० तर जामखेड येथे १२५ ऑक्सीजन सिलेंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. हवेतून ऑक्सीजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे. या प्रकल्पामुळे कर्जत व जामखेड तालुके ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कर्जत येथे १८ केएल लिक्वीड ऑक्सीजन स्टोरेज टँकला देखील मंजुरी मिळाली असून त्याद्वारे ऑक्सीजन साठवणूक देखील करता येणार असल्याने यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील इतर कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन सिलेंडर मिळवण्यासाठी तारेवारची कसरत करावी लागणार नाही. करमाळा, परांडा, भूम, दौंड, बीड, कडा व आष्टी या भागातून देखील अनेक कोरोनाबाधित रुग्ण कर्जत व जामखेड येयेथील सुसज्ज जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply