Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या चुकांवर अमेरिकेचे बोट; पहा बायडेन प्रशासनाच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांचे मुद्दे

दिल्ली : जगभरात विश्वगुरु आणि वॅक्सिनगुरू बनण्यासाठीचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात भारत जगभरात करोनागुरू म्हणून बदनाम झाला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशसकीय चुका जबाबदार असल्याचा मुद्दा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी मांडला आहे.

Advertisement

कोरोनावर सीनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार तथा पेन्शन समितीपुढील सुनावणीत फाउची यांनी तेथील खासदारांना म्हटले की, अमेरिकेने भारताकडून काय धडा शिकायला पाहिजे. जागतिकदृष्ट्या विचार केल्यास एका ठिकाणी आलेली महामारी कधीही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्यासाठी सर्वांनी तयार राहिले पाहिजे. त्यात अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात भारताने केलेल्या चुकांतून धडा घेण्याची गरज आहे.

Advertisement

डॉ. अँथनी फाउची यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. कोरोना संपला आहे, हा गैरसमज करून भारताने वेळेआधीच देशात व्यवहार खुले केले.
  2. जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक प्रयत्न गरजेचे आहेत.
  3. अमेरिकेत जोवर करोना विषाणू सर्व ठिकाणी संपणार नाही तोवर महामारी संपल्याचे घोषित करू करता येणार नाही. भारताने तीच चूक केली.
  4. भारतात भयंकर स्थिती उद्भवली असून महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे भारतातील अनेक राज्ये सध्या रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लसी, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याला सामोरी जात आहेत.
  5. सार्वजनिक आरोग्य सुविधांची सद्य:स्थिती सुधारावी लागणार आहे. भविष्यातील महामारीचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधेत विशेष तयारी करावी लागेल.

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply