Take a fresh look at your lifestyle.

इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील वादाचे ‘हे’ आहे मूळ कारण, वाचा तर खरं..!

नवी दिल्ली : धर्म ही अफूची गोळी असल्याचे म्हटलं जातं.. जाती-पाती नि धर्माशीच कोणत्याही वादाचे मूळ असते. त्यातही कट्टरतावादाचा केंद्रबिंदू कायम ‘धर्म’ राहिला आहे. सध्या इस्रायल नि पॅलेस्टाईनमध्ये जो जोरदार संघर्ष सुरु आहे, तोही याच कट्टरतावादातून..

Advertisement

आतापर्यंतच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून, हा वाद अजूनही शमलेला नाही. अवघे जग कोरोनाशी लढत असताना, या दोन देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादाचे मूळ काय आहे, कशासाठी या दोन देशातील नागरिक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत? चला तर मग, आज आपण या वादाच्या मुळाशी जाऊ या..

Advertisement

.. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वादाचे मूळ आहे ‘जेरुसलेम’ शहर. ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम समाजासाठी हे अत्यंत महत्वाचे आणि पविञ शहर आहे. हिब्रू भाषेत ‘येरुशलायिम’, तर अरेबिकमध्ये ‘अल कुडस्’ या नावाने हे शहर ओळखले जाते. इतिहासातील हे सर्वात जुने शहर आहे. अनेकांनी या शहरावर हल्ला केला. ते जिंकले आणि पुन्हा पुन्हा उभारले.

Advertisement

आता या शहरावर तीन धर्माचे लोक आपला दावा सांगतात. त्यातून वाद होतात नि हे शहर कायम चर्चेत राहते. 1967 मध्ये इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग ताब्यात घेतला. तसेच हे अख्खं शहर आमच्याच मालकीचं असल्याचं सांगितलं. तर पॅलेस्टाईनला हे शहर आपली राजधानी असल्याचं वाटत. या दोन्ही देशातील वाद इस्राईलच्या सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

Advertisement

या वादावर 10 मे रोजी सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या सुनावणीत पूर्व जेरुसलेममधील लोकांना बाहेर काढले जाईल, अशी भीती वाटत होती. त्यातूनच 7 मे रोजी ‘अल अक्सा’ मशिदीसमोर नमाजसाठी जमलेल्या मुस्लिम व इस्राईल पोलिसांत चकमक उडाली आणि भडका उडाला.

Advertisement

पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या कट्टरतावादी संघटनेने जेरुसलेमवर 100 क्षेपणास्रे डागली. त्याला उत्तर देण्यासाठी इस्राईलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतील ‘द हनादी टॉवर’ या 13 मजली इमारतीवर हवाई हल्ला केला. त्यात 9 लहान मुलासह 20 जणांचा मृत्यू झाला.

Advertisement

गाझा पट्टीवर आमचा ताबा असून, अल अक्सा मशिदीच्या संरक्षणासाठी आणखी हल्ले करण्याची धमकी ‘हमास’ संघटनेने दिली आहे. दोन्ही देशांनी शांतता राखावी, यासाठी जगभरातील देश प्रयत्न करीत आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply