Take a fresh look at your lifestyle.

मुलाच्या विरहाने व्याकुळ! मृत मुलाच्या राखेला कवटाळून झोपते ‘ही’ माउली..!

कोरोनाने अनेकांना पोरके केले. कुणाची आई गेली, तर कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण.. जिवाभावाची माणसं सोडून गेली. लेकरांच्या डोक्यावरील मायेचं छप्पर हरवलं.

Advertisement

एका माउलीने कोरोनामुळे नव्हे; पण एका अपघातात पोटचा गोळा गमावला. पण हे सत्य त्या मातेला मान्यच नाही. मुलाच्या विरहानं ही आई व्याकुळ झाली आहे. ज्या ठिकाणी मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे जाऊन ही माता मुलाच्या राखेला कवटाळून झोपते.

Advertisement

मंगूबेन चौहान असं या अभागी मातेचं नाव. गुजरातमधील जुनीरोह गावात ती राहते. 4 महिन्यांपूर्वी एका अपघातात तिच्या मुलाचं दुर्दैवी निधन झालं. मुलाच्या मृत्यूला चार महिने झाले तरी, मंगुबेन यांना विश्वास बसलेला नाही. जेव्हा जेव्हा मुलाची आठवण येते, तेव्हा तेव्हा ही माता मुलाला अग्नि दिलेल्या ठिकाणी जाऊन राखेवर जाऊन झोपतात.

Advertisement

मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून या मातेला अजूनही सावरता आलेले नाही. गेल्या चार महिन्यांत त्या अनेकदा राखेत जाऊन झोपल्या आहेत. त्यांचं दुःख आता गावकऱ्यांनाही बघवत नाही. अनेकांनी त्यांचे सांत्वन केले, त्यांच्या मनाची समजूत घातली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Advertisement

घरातून मंगूबेन गायब झाल्या, की तिचे कुटुंबीय तिच्या मुलाला चिता दिलेल्या ठिकाणीच येतात. त्यांची समजूत घालत त्यांना परत घरी घेऊन जातात. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांचा हा दिनक्रमचं झाला आहे. मुलाचा मृत्यू मंगुबेन यांच्या प्रचंड जिव्हारी लागला असून, त्या धक्क्यातून त्या अजूनही सावरलेल्या नाहीत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply