Take a fresh look at your lifestyle.

‘या’ जातीच्या उसाच्या नोंदी न घेणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना नाही, साखर आयुक्तांचा इशारा!

नगर : नगर जिल्हा..उसाच्या आगार.. सधन, संपन्न या जिल्ह्यात सर्वाधिक ऊसउत्पादन होते. त्यामुळे साहजिकच कारखान्यांची संख्याही जास्तच..या कारखान्यांभोवतीच सगळे राजकारण फिरत असते. मध्यंतरी विरोधी कार्यकर्त्याचा ऊस एका कारखान्याने न तोडल्याने संबंधित शेतकऱ्याने थेट उसाला काडी लावली होती. विरोधकांच्या उसाच्या नोंदी न घेणे, त्यांची ऊसतोड होणार नाही, असे प्रकार नगर जिल्ह्याला नवे नाहीत. काही कारखाने विशिष्ट जातीच्या उसाच्या नोंदी घेत नसल्याचेही समोर आले आहे. असाच प्रकार को-265 या ऊसाच्या जातीबाबत समोर आला आहे.

Advertisement

को-265 हा ऊसाचा वाण पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसित केला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या ऊसाच्या वाणाची शिफारस केली. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) त्यास प्रमाणित केले.

Advertisement

असे असताना काही कारखाने को-265 या ऊसाची नोंद घेत नव्हते. ऊस नोंद घेण्यास नकार देणाऱ्या काही सहकारी व खाजगी कारखान्यांची तक्रार शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाकडे केल्या होत्या. साखर आयुक्तालयाने 16 नंबर 2018 रोजी साखर कारखान्यांना सूचना देऊनही काही कारखाने तरीही या ऊसाच्या नोंदी घेत नव्हत्या. याबाबत पुन्हा तक्रारी आल्यावर साखर आयुक्तालयाने कडक धोरण घेतले आहे.

Advertisement

आयुक्तालयातील साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सर्व सहकारी व खासगी कारखान्यांना याबाबत पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. को- 265 या ऊस जातीच्या लागवडीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. या जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून, ‘व्हीएसआय’ने या उसाचे वाण लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.

Advertisement

सर्व साखर कारखान्यांनी ‘को-265’ या ऊस जातीची नोंद घ्यावी, अन्यथा साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल, असा इशारा शेळके यांनी पत्रात दिला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply