Take a fresh look at your lifestyle.

मुंब्र्यामधील ‘त्या’ मुद्द्याकडेही भाजपचे भातखळकर यांनी वेधलेय सरकारचे लक्ष..!

मुंबई : सध्या करोना कालावधीत दररोज लाखोने नवीन रुग्ण सापडत आहेत आणि देशभरात हजारोंनी मृत्यू होत असतानाही निवडणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचा जोर कमी झालेला नाही. कुंभमेळा आयोजित करून 15 पेक्षा जास्त लाखांची गर्दी झाल्यावर टीका झाली होती. त्यानंतर पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि धार्मिक कार्यक्रमांच्या दुष्परिणामाने अनेकांची झोप उडाली आहे. त्याचवेळी काही ठिकाणी आता ईद या सणानिमित्त जोरदार गर्दी होताना दिसत आहे.

Advertisement

गर्दी म्हणजे करोना रुग्णांच्या संख्येचा गुणाकार करणारी जागा. जितकी गर्दी मोठी तितका त्याचा दुष्परिणाम जास्त. मात्र, धार्मिक कट्टर आणि करोना विषाणूच्या संकटात देशापेक्षा धार्मिकता जास्त महत्वाची मानणारी मंडळी अजूनही त्याच जगात वावरत आहेत. त्याचाच प्रत्यय आतापर्यंत अनेकदा सर्वच धार्मिक कार्यक्रमातून आलेला आहे. आताही ईद सणानिमित्त अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामुळे करोना रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते… कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत? https://t.co/7fUec3UGVW” / Twitter

Advertisement

मुंब्रा येथील अशाच एका मोठ्या गर्दीची बातमी ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेली आहे. तेथील गर्दी अनेकांच्या काळजाचा ठेका चुकवणारी आहे. त्याच मुद्द्यावर मग भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवण करून देणारी आणि राजकीयदृष्ट्या अशी पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते… कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत?

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply