Take a fresh look at your lifestyle.

भीमगर्जना..! कोरोना लसीकरणासाठी मोदी सरकारने घेतलाय ‘हा’ क्रांतिकारी निर्णय..!

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे 18
वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु असले, तरी लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागत असून, लसीअभावी त्यांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्याही कमी होताना दिसत नाही, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा सर्व नकारात्मक वातावरणात मोदी सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे.

Advertisement

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशातील कोरोनास्थितीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, की देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांत भारतीयांसाठी २१६ कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल.

Advertisement

डॉ. पॉल म्हणाले, कि भारतात आतापर्यंत जवळपास १८ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, तर अमेरिकेत आतापर्यंत २६ कोटी डोस देण्यात आले आहेत. या क्रमवारीत चीन दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

स्पुटनिक’चे जुलैपासून भारतातच उत्पादन

Advertisement

दरम्यान, रशियाची ‘स्पुटनिक’ (Sputnic) ही लस भारतात आली असून, पुढील आठवड्यापासून ती बाजारांमध्ये उपलब्ध होईल. रशियातून मर्यादित स्वरूपात ही लस आली आहे. मात्र, पुढच्या आठवड्यापासून ती नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, ‘स्पुटनिक’ लसीचे जुलै महिन्यापासून भारतातच उत्पादन सुरु होणार असल्याची माहिती मिळाली

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply