Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मिसिंग आहे ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’; पहा नेमके काय आहे ‘आउटलुक’च्या कव्हरवर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता 7 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘आउटलुक’ या मासिकाने स्पेशल इश्यू प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये त्यांनी कौतुक किंवा विरोधी लेखन न करता वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. हा अंक प्रसिद्ध झाल्याने त्यांचे मुखपृष्ठ सध्या ट्रेंडमध्ये आहे. मात्र, त्याचवेळी हे प्रकाशित झाल्यावरच त्यातील नेमके लेखन आणि बाजू स्पष्ट होणार आहे.

Advertisement

मोदी सरकारचे काम कसे आणि किती ग्रेट आहे हे दाखवून देणारे लेख रोज सोशल मिडीयामध्ये फिरत असतात. मात्र. वास्तव वेगळे असल्याचे सामान्य जनताही रोज अनुभवत आहे. आर्थिक मुद्द्यावर मोदी सरकार बॅकफूटवर असतानाच आता आरोग्याच्या मुद्द्यावरही अनेक चुका झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेच्या अध्यक्षांच्या प्रशासनानेही मोदी सरकारकडून चुका झाल्याचे म्हटले आहे. त्याकॅहेवली निवडणूक प्रचार सभा आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमात अडकलेल्या सत्ताधारी भाजपच्या धोरणामुळे करोना वेगाने फोफावल्याचेही म्हटले गेले आहे.

Advertisement

Outlook Magazine on Twitter: “𝐆𝐨𝐯𝐭 𝐨𝐟 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐧𝐠 !!! #OLMag | Latest Outlook cover evaluates ModiGovt@7, featuring articles by some of the best known voices- @pbmehta @ShashiTharoor @MahuaMoitra @manojkjhad @vijai63 Out on the stands soon. Please subscribe: https://t.co/BIlYUhT7Yh https://t.co/AIMu5pmJfT” / Twitter

Advertisement

अशातच आता ‘आउटलुक’ मासिकाने स्पेशल इश्यू प्रसिद्ध करताना थेट ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ यांनाच ‘मिसिंग’ असल्याचे म्हटले आहे. दि. 24 मे 2021 रोजीच्या अंकावरील मुखप्रुष्ठावर पांढऱ्या रंगाच्या पाटीवर ‘मिसिंग’ असे ठळकपणे म्हटले आहे. खाली तपशील देताना त्यात ‘नाव : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वय : सात वर्षे आणि इन्फोर्म : सिटिझन्स ऑफ इंडिया’ असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे भाजप समर्थकांचा तिळपापड झाला आहे. तर, विरोधकांनी या इमेजचा ट्रेंड बनवला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply