Take a fresh look at your lifestyle.

हे बरंय की.. आरोग्याच्या काळजीसाठी करोनाकाळात ‘ही’ उपकरणे ठेवा आपल्या घरात

पुणे : करोना झाल्यावर अनेकांची धावपळ होते. मात्र, अशावेळी अजिबात घाबरून न जाता शांतपणे सर्व परिस्थितीशी सामना करा. तसेच आपली स्वतःची काळजी घेण्यासह आपल्यामुळे इतरांना करोनाची बाधा होणार नाही याचीही काळजी घ्या. तसेच आपल्या घरात इतर कोणीही रुग्ण असल्यास करोना प्रोटोकॉल पळून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यासाठी काही तांत्रिक उपकरणे आपल्याकडे असतील तर चांगले. एक कुटुंब किंवा ग्रुपमध्येही असे उपकरणे घेऊन ठेवली तर नक्कीच फायदेशीर ठरतील.

Advertisement

Advertisement

कोरोना संक्रमित व्यक्तीच्या ऑक्सिजनची पातळी वेगाने खाली येण्याची उदाहरणे आहेत. भले अशा रुग्णांची टक्केवारी कमी आहे. मात्र अशावेळी ऑक्सिमीटर (Oximeter) उपयोगी ठरू शकतो. याचा वापर रक्तामधील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी केला जातो. ऑक्सिमीटर आपल्याला बाजारात सहजपणे मिळतो. ऑक्सिजनची पातळी मोजण्यासह हृदयाच्या ठोक्यांची गती याद्वारे मोजली जाते.

Advertisement

Advertisement

ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर (Oxygen Concentrator) हे हवेतील इतर वायूंमधून ऑक्सिजन फिल्टर करून शुद्ध ऑक्सिजन मिळविण्यासाठीचे यंत्र आहे. अशावेळी हवेतील इतर अशुद्धींसह नायट्रोजनदेखील काढून टाकणे आवश्यक आहे. यात कॉम्प्रेसर, मोटर्स, प्रेशर नियामक, हीट एक्सचेंजर्स आणि इतर घटक समाविष्ट आहेत. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर हा ऑक्सिजन बनवित नाही. फक्त याद्वारे ऑक्सिजन एकत्रित केला जातो. ऑक्सिजनचा प्रवाह मिनिट प्रतिलिटरमध्ये मोजला जातो. अशा परिस्थितीत सतत 5 एलपीएम (लीटर / मिनिट) प्रवाहातून ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी आपल्याला कमीतकमी अशा एका डिव्हाइसची आवश्यकता असते. विशेष गोष्ट अशी आहे की त्यास ऑक्सिजन सिलेंडरसारखे पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही.

Advertisement

Advertisement

कोविडचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे तीव्र ताप. अशा परिस्थितीत घरी ताप मोजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर (Digital Thermometer) असणे खूप महत्वाचे आहे. हे वैद्यकीय उपकरण आजकाल बरेच वापरले जात आहे. कॉन्टॅक्टलेस इनफ्रा-रेड थर्मामीटर नॉन-इंवेसिव आहे आणि रुग्णाच्या शरीराचे तापमान याद्वारे समजते. रुग्णाच्या तापमानावर लक्ष ठेवण्यास हे उपयुक्त आहे. याद्वारे कोरोना रुग्णांचे तापमान जवळ न येता तपासले जाऊ शकते. हे बाजारात सहज उपलब्ध आहे आणि आपण ते सहजपणे ऑनलाइन खरेदी करू शकता.

Advertisement

Advertisement

सध्या बाजारात अशी अनेक स्मार्टवॉच (Smartwatch) आहेत जे एसपीओ 2 लेव्हल आणि नाडीच्या ठोक्यासह आरोग्याशी संबंधित बरीच माहिती देतात. रिफ्लेक्शन ऑक्सीमेट्री स्मार्टवॉचमध्ये वापरली जाते. स्मार्टवॉचमध्ये एसपीओ 2 लाइटद्वारे मोजले जाते जे त्वचेखालील रक्ताचे प्रतिबिंब असते. यामध्ये लाइट एमिटिंग सेंसर आणि लाइट रीडिंग सेन्सर दिले आहेत. आपण नेहमीच स्मार्टवॉच वापरू शकतो.

Advertisement

Advertisement

फिटनेस बँडची (SPO2 Fitness Bands) मागणीही सध्या वेगाने वाढत आहे. हे आरोग्याविषयी माहिती देतात. यामध्ये एसपीओ 2 पातळी आणि नाडीच्या ठोक्यासह आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देते. रिफ्लेक्शन ऑक्सीमेट्री स्मार्टवॉचसह फिटनेस बँडमध्येही असते. बाजारामध्ये शाओमी, ओप्पो, गोकियी आणि इतर अनेक ब्रँड्सचे फिटनेस बँड्स तुम्हाला सहज मिळतात.

Advertisement

Advertisement

आजची परिस्थिती खरोखरच काळजी घेण्यासारखी आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय सतर्कता प्रणाली (Medical Alert System / मेडिकल अलर्ट सिस्टम) उपयुक्त आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही सिस्टम मित्र आणि कुटुंबियांना सतर्क करू शकते आणि मदतीसाठी त्यांना वेळीच संपर्क झाल्याने मदत मिळते. ही यंत्रणा गळ्याभोवती टांगली जाऊ शकते किंवा बँडसारखे परिधान केले जाऊ शकते.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply