Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. इस्रायली आयर्न डोमच्या जादुपुढे ‘हमास’ निष्प्रभ; पहा नेमके कसे होतात शत्रूचे रॉकेट हवेतच गायब..!

तेल अवीव : इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील वाद कमी होण्याची शक्यता संपत आहे. उलट तुर्कस्तानसह अनेक देशांनी यात तेल ओतण्याचे काम सुरू केल्याने जागतिक राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्याचवेळी इस्रायलने तेल अवीवच्या चहुबाजूने ५ आयर्न डोम लावल्याची आणि त्याद्वारे शत्रूने सोडलेले रॉकेट हवेतच नष्ट केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची बातमी येऊन धडकली आहे.

Advertisement

इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही देशांच्या दरम्यान  हवाई हल्ले सुरू आहेत. २०१४ नंतर इस्रायलवरील हा सर्वात मोठा रॉकेट हल्ला आहे. हल्ल्यात तडाख्यात येऊन १२ लहान मुलांसह ५९ जणांनी प्राण गमावले. ३०० जण जखमी झाले आहेत. इस्रायली माध्यमांनुसार, हमासने सोमवारपासून बुधवारपर्यंत १०५० क्षेपणास्त्र डागले होते. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे त्यांची संरक्षण प्रणाली आयर्न डोमने हवेतच नष्ट केली आहेत.

Advertisement

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गँट्स यांनी म्हटले आहे की, आता इस्रायली लष्कर गाझा पट्टी आणि पॅलेस्टाइनमधील हल्ले बंद करणार नाही. शत्रू जोपर्यंत पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत इस्रायल थांबणार नाही. त्यानंतरच शांततेसाठी चर्चा होऊन दीर्घावधीपर्यंत शांतता कायम राखण्याचा उपाय करण्यासाठीचा प्रयत्न असेल. आयर्न डोम याबाबतचे मुद्दे असे :

Advertisement
  1. इस्रायलने तेल अवीवच्या चहुबाजूने ५ आयर्न डोम लावले आहेत
  2. एका डोमची किंमत ३४० कोटी रुपये
  3. डोम अमेरिकेच्या आर्थिक व तांत्रिक मदतीने २०११ मध्ये सक्रिय झाले
  4. डोम फायटर प्लेनमधून डागली जाणारी क्षेपणास्त्रे व ड्रोन्स यांना निशाणा करते
  5. डोमचा सक्सेस रेट ८० ते ९० टक्के आहे

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply