Take a fresh look at your lifestyle.

ही तर टाळूवरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती; पहा चीनने आणखी कशी केलीय आगळीक..!

मुंबई : चीन म्हणजे पैशांसाठी काहीही करण्याच्या वाईट प्रवृत्तीचा देश. त्याच जोरावर त्यांची हुकुमशाही शाबित आहे. आताही जगभरात करोना विषाणूच्या संक्रमणासाठी जबाबदार असलेल्या या बेजबाबदार देशाने आयात-निर्यात धोरणामध्ये दिलेला शब्द न पाळण्याचे बोगस धोरण ठेऊन जगाची कोंडी केली आहे. जग संकटात असताना त्यातून वाईट विचारांनी संधी शोधून अनेक वस्तूंचे भाव तब्बल पाचपटीने वाढवण्याचे पातक चीनने केले आहे. जगभरातून त्यांच्यावर यामुळे टीका होत आहे.

Advertisement

जगभरात करोनाची दुसरी लाट सक्रीय आहे. याचा सामना करण्यासाठी भारतही जगभरातून मेडिकल कीट, औषधे आणि वस्तू खरेदी करीत आहे. परंतु, चीनी पुरवठादारांनी कोविड कंटेन्ट वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठी भाववाढ केली आहे. हाँगकाँगमध्ये भारताच्या कौन्सिल जनरल प्रियंका चौहान यांनी या दरवाढीबाबत निषेध व्यक्त केला आहे. चीनी वृत्तपत्र दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना प्रियंका चौहान म्हणाल्या की कोविड 19 विरुद्धच्या लढाईत चीन उत्पादनांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवेल अशी भारताला आशा आहे.

Advertisement

चीनी पुरवठादारांनी कोविडशी संबंधित वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. 10 लिटरच्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची सरासरी किंमत 200 डॉलर आहे. मात्र, बरेच पुरवठा करणारे आता त्यासाठी 1000-1200 डॉलर इतके पैसे मागत आहेत. चिनी पुरवठादारांनी एकतर्फी पद्धतीने खरेदी करार करार रद्द केले आहेत. बरेच पुरवठा करणारे 10 लिटर कॉन्सेन्ट्रेटरच्या किंमतीत आता 5 लिटर किंवा 8 लिटर कॉन्सेन्ट्रेटर देण्याच्या ऑफर करीत आहेत.

Advertisement

चीनच्या औषध पुरवठादारांनी अचानकपणे करार रद्द केले आहेत. आता चीनचे औषध पुरवठा करणारे लिलावाच्या माध्यमातून रिमडेशवीर आणि फेविपिराविर सारख्या औषधांचा कच्चा माल ऑफर करत आहेत. त्याचवेळी चीनची रेडक्रॉस सोसायटी आपल्या भारतीय युनिटला देणगी देत ​​आहे. चीनच्या दूतावासानेही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर भारतात पाठविली जात आहेत. चीनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पुरवठा लाइन खुली आहे आणि उत्पादनांचे दर स्थिर आहेत. तर, दुसरीकडे व्यापारी कोंडी केली जात आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply